● सलग ७ व्या वर्षी शंभर टक्के निकाल
पिंपरी,दि.३० :- पिंपळे गुरव येथील जिनियस क्लासेसने एसएससी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली असून क्लासच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.
क्लासचा विद्यार्थी आश्विन साळुंखे याने ८५.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला.
रिद्धी झगडेने ८३.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर
निशा पवार हिने ८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला.
अमृता जाधव (८१.८०)अथर्व शिंदे (८१.६०) श्रुतिका शेळके (७९.४०) आदींसह अन्य विद्यार्थ्यांनी देखील चांगले यश मिळवले आहे.
……
● माझ्या यशात जिनियस क्लासेसचा मोठा वाटा आहे. क्लासमधील सर्व शिक्षक तज्ञ व अनुभवी आहेत. वर्षभर बोर्ड परीक्षेची चांगली तयारी करून घेतली होती. त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जाता आले.
_अश्विन साळुंके
विद्यार्थी , जिनियस क्लासेस
● क्लासमध्ये तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे सराव करून घेतला . जास्तीत जास्त उत्तर पत्रिका सोडवून घेतल्या. तसेच गेस्ट लेक्चर्सचे आयोजन करण्यात आले.
– रिद्धी झगडे
विद्यार्थीनी ,जिनियस क्लासेस
नवी सांगवीतील एस.जे.एच गुरुनानक हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० %
Comments are closed