नवी सांगवी, दि.१, जनता शिक्षण संस्थेच्या नवी सांगवी येथे ब्लॉसम इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल शाळेच्या मुख्याध्यापक पदी प्रीती चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली तर एस जे एच गुरूनानक हायस्कूल (माध्यमिक विभाग ) शाळेच्या मुख्याध्यापक पदी नंदा काकडे यांची नियुक्ती करण्यात आली. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप व जनरल सेक्रेटरी प्राध्यापक सुभाष जावळे यांच्या हस्ते दोन्ही मुख्याध्यापकांना नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नंदा काकडे यांना सन्मानित करताना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप व उपस्थित मान्यवर.

प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रीती चव्हाण यांना नियुक्तीपत्र देत शुभेच्छा देताना जनता शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा.सुभाष जावळे व अध्यक्ष जयप्रकाश जगताप तसेच इतर उपस्थित मान्यवर.

यावेळी जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रमेश कार्ले, कार्याध्यक्ष महेशकुमार आगम, खजिनदार  कविता गोरे, जॉईट सेक्रेटरी रवींद्रनाथ नवले, असिस्टंट सेक्रेटरी राजेंद्र खरमाटे, प्रा.प्रदीपकुमार नागवडे ,ग्रामीण संचालक हेमंत तांबे , बाळासाहेब पौळ ,माजी जनरल सेक्रेटरी लालासाहेब भुजबळ, माजी मुख्याध्यापक सुदाम हिरवे , मुख्याध्यापक काळेल ,मुख्याध्यापक फापाळे, शिक्षक रासकर , अशोक गोसावी, बेळगे, नाझीरकर, इंग्रजी माध्यम नवी सांगवीतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

जनता शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा.सुभाष जावळे म्हणाले कि आपल्या शाळा ह्या आपल्या परिसरातील उत्तम ज्ञान दान करणारे केंद्र बनावे. आदर्श विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शाळेत विविध उपक्रम, शिबिर, कार्यक्रम राबविण्यात यावेत.  आपली जनता शिक्षण संस्था ही आदर्शवत संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त संस्था आहेच ती भविष्यातील विस्तृत, व्यापक शैक्षणिक संकुलात परावर्तित व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप यांनी शिक्षक, विद्यार्थी व शाळा यातील सहसंबध सांगून शालेय व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले तसेच शाळांच्या विकासासाठी मार्गदर्शन केले. 

 

 प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रीती चव्हाण म्हणाल्या की शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, योजना राबवण्याचे धोरण आखण्यात येणार आहे तसेच विविध पातळीवर शाळेसंदर्भात योग्य विकास आराखडा तयार करून विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल.

 

माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नंदा काकडे म्हणाल्या की आपली शाळा सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील सर्वात जुनी शाळा असून एक विशेष नावलौकिक प्राप्त असलेली शाळा आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे सातत्याने कार्य ही शाळा करत आहे. शाळेतून कित्येक गुणवंत विद्यार्थी घडले असून विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत यापुढेही अशाच पद्धतीने देशाच्या उज्वल भविष्यासाठी उत्तम आदर्श नागरिक तयार व्हावेत असे आदर्शवत शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा मानस आहे. 

 


 

 

नवी सांगवीतील एस.जे.एच गुरुनानक हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० %

मानवी हस्तक्षेप वन्य प्राण्यांच्या लठ्ठपणास जबाबदार ?

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!