औंध,  दि.१ :- जनता शिक्षण संस्थेच्या औंध येथील श्री. शिवाजी विद्यामंदिर प्रशालेमध्ये संस्थापक जयवंतराव तथा दादासाहेब जगताप यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सदर पुतळा सुधीर बहिरट यांनी आपल्या वडिलांच्या कै. प्रकाश बहिरट पाटील यांच्या स्मरणार्थ प्रशालेस भेट दिला आहे.  

कार्यक्रमास जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप , उपाध्यक्ष रमेश कार्ले, कार्याध्यक्ष महेशकुमार आगम ,खजिनदार कविता गोरे ,जनरल सेक्रेटरी प्रा.सुभाष जावळे ,जॉईंट सेक्रेटरी रवींद्रनाथ नवले ,असिस्टंट सेक्रेटरी राजेंद्र खरमाटे उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रशालेचे नवनियुक्त प्राचार्य सुभाष दाभाडे , संस्थेचे तहहयात सभासद शहाजीराव रानवडे, माजी जनरल सेक्रेटरी लालासाहेब भुजबळ, माजी प्राचार्य सुदाम हिरवे, प्राचार्य अनिरुद्ध काळेल, प्राचार्य रविंद्र फापाळे, प्राचार्य अतुल ओतारी, विविध शाखेतील आजी- माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि दादामाई विचार मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

जनता शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा.सुभाष जावळे म्हणाले कि संस्थेचे नवीन संचालक मंडळाकडून सातत्याने विकास कामे चालू असून संस्थेच्या सर्व प्रशालेचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आले आहे.

अध्यक्ष जयप्रकाश जगताप म्हणाले की जनता शिक्षण संस्थेची सुरूवात करताना खूप मोठ्या प्रमाणावर दादा-माई यांनी कष्ट केले.  आपली प्रत्येक शाळा ही आदर्शवत संस्कारकेंद्र बनावी यासाठी जीवनभर कार्य केले.  

ॲड. तानाजी चोंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की औंध प्रशालेला सुधीर बहिरट पाटील यांनी आज त्यांचे वडिल कै. प्रकाश बहिरट पाटील यांच्या स्मरणार्थ, समाजावर अनंत ऋण आहे अशा विभूतींचा म्हणजे, संस्थापकांचा पुतळा देऊन एक कायमस्वरुपी, अविस्मरणीय काम केले आहे!

या प्रसंगी कै प्रकाश बहिरट पाटील यांचा मनमोकळा, हसरा, प्रामाणिक चेहरा आमचे डोळ्यासमोर उभा राहीला, He was very close and respective person for me!
उभय बहिरट पाटलांनी संस्थेसाठी विशेषतः वडिलांनी औंध प्रशालेसाठी मोलाच योगदान दिलेले आम्ही समक्ष पाहीले आहे!

संस्थापक आदरणीय कै जयंतरावजी जगताप आणि कै प्रकाश बहिरट पाटील यांचे नाव योग्य स्वरुपात राखले गेले आहे!

असो, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री जयप्रकाश जगताप श्री सुधीर बहिरट पाटील,जनरल सेक्रेटरी माननीय जावळेसर सर्व माननीय संचालक, हितचिंतक या सर्वांचे शब्दात मानावे तेवढे आभार कमी पडतील..

औंध ग्रामस्थांतर्फे तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.

आम्हाला इच्छा असुनही काही अपरिहार्य परिस्थितीमुळे सदर कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही! – ॲड तानाजी चोंधे
मा. विद्यार्थी व तहयात सभासद

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!