पुणे दि. 2( punetoday9news):- पुणे विभागातील 69 हजार 221 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 10 हजार 791 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 645 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 925 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 86 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.48 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 88 हजार 584 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 58 हजार 318 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 231 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 17 हजार 793 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 729, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 82, पुणे कॅन्टोंन्मेंट 137, खडकी विभागातील 25 व ग्रामीण क्षेत्रातील 3 हजार 465 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 2 हजार 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 361 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 377, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 66, पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 43, व ग्रामीण क्षेत्रातील 157 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 808 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 65.83 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 818 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 819, सातारा जिल्ह्यात 234, सोलापूर जिल्ह्यात 224, सांगली जिल्ह्यात 274 तर कोल्हापूर जिल्ह्यात 267 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख 22 हजार 860 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 10 हजार 791 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!