पिंपळे गुरव , दि.४ :- देशाचे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री , लोकनेता, मराठवाड्याचे भूमिपुत्र, महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय गोपिनाथरावजी मुंडे  याच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त दि. ३ रोजी मराठवाडा जनविकास संघ आणि मित्रपरिवार यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

मराठवाडा जनविकास संघाचे खजिनदार दत्तात्रय धोंडगे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमाच्या वेळेस संघाचे अध्यक्ष / संचालक अरुण पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले. स्वाभिमान व संघर्ष हे साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे ठळक वैशिठ्य होते, मुंडे साहेबांच्या जाण्याने आपला महाराष्ट्र पोरका झाला, गोपीनाथराव मुंडे हे सर्व जनतेचे आधारस्तंभ होते आणि खऱ्या अर्थाने ते एक जानता नेता होते म्हणूनच त्यांना लोकनेते म्हणून ओळख मिळाली होती असे म्हणून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. मराठवाड्याच्या मातीतील सळसळत्या रक्तामध्ये ज्या लोकनेत्याचा जन्म झाला ते म्हणजे गोपीनाथजी मुंडे. दुधात साखर विरघळावी असा स्वभाव साहेबांचा होता, महाराष्ट्राला दिशा देण्यात प्रगतशील करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता.

यावेळी शारदा मुंढे यांनी मराठवाडा भुमीपुत्र यांच्या जीवनावर आधारित येणारी संकटे,कष्ट यांना त्यांच्या मार्मिक भाषे मध्ये विचार मांडले. मुंडे साहेब आणि त्यांचे घराणे या बाबत सर्व उपस्थितांना माहिती दिली.

सामाजिक कार्यकर्ते नितीन चिलवंत हे कार्यक्रम प्रसंगी बोलताना म्हणाले नाथाचा नाथ जो तोच गोपीनाथ ह्यांच्या जीवनपटातून जनतेच्या भूमिपुत्राला त्यांच्या आदर्श घालून दिला . सामान्य कार्यकर्त्यापासून मंत्री पदा पर्यंतकेलेली कार्य उल्लेखनीय आहेत .कोणी किती वर्ष जगला त्या पेक्षा कसा जगला याला महत्व आहे . राजकरणाच्या पलीकडचे गोपीनाथजी मुंडे साहेब आहेत. असे ते म्हणाले .

अशाप्रकारे मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी करून संघाचे मीडिया प्रमुख अमोल लोंढे यांनी कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

यावेळी अण्णा जोगदंड, प्रबोधनकार शारदा मुंडे, दत्तात्रय धोंडगे,मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक/अध्यक्ष अरुण पवार , शिवकुमारसिंह बायस, अमोल लोंढे,सामाजिक कार्यकर्ते नितीन चिलवंत आदी मान्यवर उपस्थित होते.


 

औंध प्रशालेमध्ये संस्थापक ज.बा.जगताप यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

नवी सांगवीतील ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापक पदी प्रीती चव्हाण तर एस.जे.एच गुरूनानक हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी नंदा काकडे.

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!