नवी सांगवी, ता. 12 ः पिंपळे निलख विशालनगरात सातत्याने होत असलेल्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ स्थानिक सोसायटीतील रहिवाश्यांनी मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. कित्येक वर्षापासून येथील रहिवाश्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने येथील नागरिक कमालीचे अस्वस्थ झाले असून त्याचाच भाग म्हणून आज येथील पन्नासहून अधिक सोसायट्यांमधिल नागरिकांनी एकत्र येऊन मूक मोर्चाद्वारे ‘ पाणी नाही तर मतदान नाही ‘ या घोषवाक्यातून आपल्या संतापाला वाट करून दिली.

विशालनगरातील उच्चभ्रू सोसायट्यांमधिल कडेवरील तान्हुल्या बाळांसह सर्व लहानमोठे जेष्ठ अगदी वार्धक्याने थकलेले या मूक मोर्चात सहभागी झाले होते. कोणत्याही घोषणा अथवा गोंगाट न करता शांतपणे प्रत्येकाने आपल्या घरूनच अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या निषेधाचे फलक हातात रंगवून आणले होते. आंम्ही नियमीतपणे महापालिकेचे पाण्यासह सर्वप्रकारचे कर भरत असताना पाणी आंम्हाला पुरसे पाणी का नाही अशी भावनाही या पोस्टर मधून या रहिवाश्यांनी व्यक्त केली. ओला दुष्काळ पडण्याची वेळ आली असतानाही आंम्हाला पाण्याचे टँकर लागतायेत यासारखे दुर्देव आणखी कोणते ? असा सवालही मोर्चातील सहभागींनी केला. महापालिकेचे अधिकारी ते स्थानिक नगरसेवकांना याबाबत अनेकदा तक्रारी करूनही यावर ठोस कार्यवाही होत नसल्याने आंम्ही मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे या मोर्चेकऱ्यांनी सकाळ प्रतिनिधीच्या निदर्शनास आणून दिले.

चौकट ः दररोज साडेसातशे रूपये मोजून आंम्ही पाण्याचा टँकर मागवितो. परंतु त्या पाण्याचा पीएच तपासला तर तो महापालिकेच्या पाण्या महापालिकेच्या पाण्यासारखाच आढळतो. याचा अर्थ या ठिकाणी खूप मोठी टँकर लॉबी कार्यरत असून त्यामुळेच ते कोणाच्या तरी मोठ्या आश्रयाखाली काम करीत असल्याचे मोर्चातील सहभागी नागरिकांनी नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर सांगितले. जो पर्यंत आमचा पाणी प्रश्न मिटत नाही तोपर्यंत दर शनिवारी आंम्ही हा मोर्चा काढणार असल्याचेही या सभासदांनी सांगितले.

आचारसंहितेमुळे महापालिका अधिकाऱ्यांनी याप्रश्नावर बोलण्यास देण्यास असमर्थता दर्शविली.

फोटो ः nsv 12 10 03.jpg, nsv 12 10 04.jpg, nsv 12 10 05.jpg
विशालनगर, पिंपळे निलख ः सातत्याने होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ स्थानिक सोसायट्यांमधिल रहिवाश्यांनी मूकमोर्चा काढून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

#

Comments are closed

error: Content is protected !!