पुुणे, दि.३( punetoday9news):-  रोजच पाच तास ऑनलाईन शाळा, कसलाही विरंगुळा, वेगळेपण नसल्याने  विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मामासाहेब मोहोळ महाविद्यालय,पौडरोड, पुणेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तने गणपती मूर्ती बनवण्याची ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले.

या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच बनवा घरची गणेश मूर्ती हा उपक्रम ऑनलाईन घेण्यात आला. झूम वेबिनरमध्ये ४४२ विद्यार्थ्यांनी, तर फेसबुक व युट्युबवर हजारो विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा आस्वाद घेतला. चार तास चालेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती बनवण्याचा आनंद लुटला. या कार्यशाळेचे उदघाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल.एम. पवार, यांनी केले. उदघाटन प्रसंगी श्रीमती विजया चव्हाण ,प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, प्रा.अनिल दाहोत्रे, डॉ. योगेश पवार, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. सपना राणे इ.उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी उपसचिव पवार यांनी लॉकडाऊन काळात शैक्षणिक धडे शिक्षकांना ऑनलाईन देताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. पण संस्थेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित याचे आधुनिक धोरण विचारात घेता संस्था सर्व स्तरावर ऑनलाईन काम करीत आहे. ऑनलाईन गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा हा उत्तम उपक्रम प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे व त्यांचे सहकारी यांनी गणेश अगमनापूर्वी किंवा उत्सवापूर्वी घेतल्याने घरी असलेल्या विद्यार्थ्यांना एक मेजवानी मिळाली आहे, यात पालकांनी सुद्धा खूप आनंद घेतला, एक मूर्ती बनवण्यासाठी संपूर्ण कुटूंब कार्यरत होते,एकूणच उत्तम उपक्रम घेऊन शाळा-महाविद्यालय प्रत्यक्षात सुरू असल्याची अनुभूती या वेबिनारच्या माध्यमातून आली.असे सांगितले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यानी केले. उपक्रम माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना उपयोगी असा उपक्रम असला तरी संस्था स्तरावर हा उपक्रम पहिलाच उपक्रम आहे. यात संस्थेच्या विविध शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतलेला आहे. गणेश मूर्ती बनव्यासाठी शाडू माती मिळाली नसली तरी काहींनी मैद्यापासून क्ले तयार करून मूर्ती बनवण्याचा आंनद घेतला. पालकांचा सहभाग सुद्धा मोठा व कौतुकस्तब्ध होता. महाविद्यालयात लॉकडाऊन काळात अनेक उपक्रम घेण्यात आले, नुकतीच संस्था स्तरावर अजित पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित सहा दिवस दिग्ज वक्त्यांची अनंत व्याख्यान माला ऑनलाईन घेण्यात आली, त्यापूर्वी महाविद्यालयाने सायबर क्राईम जनजागृती व नवीन नँक पद्धती बाबत ची ऑनलाईन सेमिनार घेण्यात आली. गणेश मूर्ती बनवायची कार्यशाळा हा उपक्रम अतिशय वेगळा होता, ज्याठिकाणी समोरासमोर गणेश मूर्ती बनवणे अवघड जाते, तेथे ऑनलाईन कार्यशाळा घेणे जिकरीचे व चॅलेंज होते, कलाशिक्षिका विजया वेल्हाळ यांनी संगीत, गणपतीची गाणी गात विद्यार्थी कंटाळणार नाही याची खबरदारी घेत खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांना कलेचे ज्ञान दिले असे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे यांनी सांगितले.

 

( फोटो : – डावीकडून प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे, सहभागी विद्यार्थी व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल.एम. पवार )

कार्यशाळेत कला शिक्षिका श्रीमती विजया वेल्हाळ यांनी गणेशाची गाणी म्हणत मूर्ती कशी बनवायची याची माहिती देत, उत्कृष्टपणे प्रात्यक्षिक देत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकडून मूर्ती बनवून घेण्यासाठी तीन तासापेक्षा जास्त वेळ लागला. विद्यार्थ्यांना कलेचे ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांनी कला शिकावी, आत्मनिर्भर व्हावे. नदी व पाण्याचे प्रदूषण न होता पर्यावरणाचे संवर्धन व्हावे. गणेश मूर्तीचे पावित्र्य राहावे. नागरिकांना एक कला अवगत व्हावी या उद्देशाने महाविद्यालयाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. गणेशोत्सवात बाजारात रासायनिक रंग, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती येतात. त्यामुळे प्रदूषण वाढते म्हणून शाडू मातीच्या मूर्ती असाव्यात मागील ३५ वर्षे त्या मुलाना मोफत मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेत आहेत, पहिल्यांदाच ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात वेगळेपण समजून आले असे कला शिक्षिका वेल्हाळ यांनी मत व्यक्त केले.

 

कला शिक्षिका

श्रीमती विजया वेल्हाळ

 

या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. अनिल दाहोत्रे, क्रीडा शिक्षक यांनी तर आभार क्रीडा संचालक डॉ.योगेश पवार यांनी मानले. संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ऍड संदीप कदम, खजिनदार ऍड मोहन देशमुख, सह-सचिव (प्रशासन) ए.एम. जाधव यांनी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वेगळी कला अवगत करून दिल्याबद्दल कौतुक केले.

Comments are closed

error: Content is protected !!