पिंपरी, ३( punetoday9news):- पिंपरी चिंचवड मधील सांगवी परिसरातील खऱ्या कोरोना योध्यांना राखी बांधून पिंपरी चिंचवड नगरसेविका शारदा सोनवणे यांनी अनोखे असे रक्षाबंधन साजरे केले आहे.सरंक्षण यंत्रणा , वैद्यकीय क्षेत्र ,आरोग्य विभाग यातील पोलीस ,डॉक्टर , नर्स , सफाई कर्मचारी हे दिवसरात्र आपली सेवा देत आहेत . स्वतःच्या कुटुंब पेक्षा संपूर्ण समाजातील नागरिकांच्या साठी कर्तव्य बजावत आदर्श म्हणून उभे आहेत . अशा महान योध्याचा यथोचित सन्मान हा रक्षाबंधनातून व्यक्त करण्यात आला.
यावेळी सांगवी पोलिस स्टेशन मधील पोलिस कर्मचारी , स्व.इंदिरा गांधी प्रसुती गृह सांगवी येथील कर्मचारी यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली
Comments are closed