पिंपरी, ४( punetoday9news):- कोकण व गणेशभक्त कोकणवासी यांचा गणेशोत्सवाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसरकारच्या वतीने कोकणातील गणेश भक्तांसाठी एसटी बस सेवा मिळणार असून एका बस मधून २२ प्रवासी प्रवास करू शकतील अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. 

एस टी बसने जाणाऱ्या प्रवाशांना ई-पास ची आवश्यकता लागणार नाही. केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे १०दिवस होम काॅरंटाइन राहील. एस टी बस चा तिकीट दर हा तोच राहिल.खासगी वाहणे दीडपट अधिक भाडे आकारू शकतात मात्र त्यापेक्षा अधिक भाडे आकारण्यात आल्यास वाहन व मालकांवर कारवाई केली जाईल.   आज (दि.४)  सायंकाळी ६ वाजल्यापासून तिकीट बुकिंग सूरू होणार आहे. निश्चित स्थळी निखालेली बस मध्ये कुठेही न थांबता निश्चित स्थळी पोहोचेल.३ हजार बस कोकण साठी राखीव आहेत.

Comments are closed

error: Content is protected !!