महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्लॅस्टिक जनजागृती उपक्रम. 

नवी सांगवी,दि.७:-   पिंपरी चिंचवड शहरातील जनता शिक्षण संस्थेच्या ब्लॉसम इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल व गुरुनानक हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांकडून आरोग्य वारीचे आयोजन करण्यात आले.

आज धावपळीच्या युगात नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये विविध आजार बळावत आहेत. निरोगी शरीर ही यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली मानली जाते. त्यानुसार समाजात आरोग्य जनजागृती होण्याच्या उद्देशाने आरोग्य वारीचे नियोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका नंदा काकडे व प्रीति चव्हाण यांच्या हस्ते ग्रंथदिंडीची पूजा करून करण्यात आली.

साई चौक- कृष्णा चौक-क्रांति चौक-फेमस चौक मार्गे विठ्ठल माऊलीच्या गजरासह निरोगी आरोग्याचे महत्व सांगणाऱ्या घोषणा देत वारी मार्गस्थ झाली. टाळ मृदुंगाच्या गजरासह विद्यार्थ्यांकडून लेझीम पथकाद्वारे जनजागृतीपर संदेश देण्यात आला.यात विविध घोषणापत्र विद्यार्थ्याकडून बनविण्यात आली होती.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील उमेश ढाकणे(ह क्षेत्रीय अधिकारी), अंकुश झीटे (सहाय्यक आरोग्य अधिकारी ) सतीश पाटील (मुख्य आरोग्य निरीक्षक )

सचिन जाधव (आरोग्य निरीक्षक) विनोद कांबळे

( बेसिक्स टीम चे झोनल इन्चार्ज), धीरज फणसे

(वॉर्ड इन्चार्ज), सुनील धावारे यांच्याकडूनही

स्वच्छ सर्वेक्षण २०२४ माहिती सांगून प्लास्टिक जनजागृती करण्यात आली.

पाच प्रकारचा कचरा प्लास्टिकचे होणारे दुष्परिणाम याबाबत रॅलीच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आली.

कार्यक्रमाचे नियोजन शीतल भुजबळ, दिपाली शहाणे, प्राजक्ता येवले, शामली खैरे यांनी केले तर प्रियंका लोमटे व सागर झगडे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.

 

#

Comments are closed

error: Content is protected !!