पावसाने यंदा परत रूद्र रूप धारण केल्यास काय ? उपाययोजना तयार आहेत का ?
पिंपरी, दि. ५ ( punetoday9news):-
गतवर्षीच्या तुलनेत आजच्या स्थितीला पुणे जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कमी आहे मात्र गतवर्षीची आठवण वाढतानाही पिंपरी चिंचवड मधील नदीकाठच्या रहिवाशांच्या अंगावर काटा उभा राहतो.
पिंपरी चिंचवड मधील पवना व मुळा नदी किनारी सांगवी, पिंपळे गुरव , वाकड, दापोडी परिसरात पूरसदृश स्थिती बनून हाहाकार माजला होता. शेकडो कुटुंबीय पुरबाधित होते कित्येक संसार उघड्यावर आले होते. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मुळशी व पवाना धरणांतून मोठ्या प्रमाणात मोडण्यात आले होते त्या पाण्यामुळे पिंपरी – चिंचवड शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती . नवी सांगवी व वाकड परिसरातील अनेक घरांमध्ये ; तसेच झोपड्यांमध्ये पाणी घुसले होते घरातील वस्तू व सर्व संसार हा पाण्यावर कुटुंबियांच्या डोळ्यासमोर तरंगत होता. रविवारी ( दि . ४ ऑगस्ट २०१९ ) रात्री एक ते दोनच्या दरम्यान अचानक परांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती . काय करावे ? कुठे जावे ? कुणाकुणाकडे मदतीची याचना करावी अशी दयनीय अवस्था बाधित नागरिकांची झाली होती.
अग्निशमन दलाच्या जवानांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले होते मात्र जीव वाचत असताना डोळ्यासमोरून कष्टाने उभा केलेला संसार पाण्यात जाताना पाहून गहिवरून येत होते.
आज पुन्हा घरे बांधून उभी राहिली पण घरातील नागरिकांच्या मनातील भय कायम आहे. शासनाने मदत केली.
नदीपात्रातील भराव काढणार.नदीपात्र स्वच्छ व रूंद होणार. अतिक्रमणावर कारवाई होणार. भिंत बांधणार वगैरे कित्येक घोषणा झाल्याही पण शेवटी कागदी घोडेच नाचले प्रत्यक्षात नदीपात्रातील सर्व अतिक्रमणे जैसे थी. किंबहुना थोडी जास्तच म्हणावी लागेल. आज पुन्हा पावसाने रूद्र रूप धारण केल्यास काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र आ वासून उभे राहते.
Comments are closed