हरिनामाचा उत्साह ; पाऊले चालती पंढरीची वाट.
नवी सांगवी,दि.१५ :- पिंपरी-चिंचवड शहरातील कै. यशवंतराव धोंडिबा टण्णू प्राथमिक विद्या मंदिर येथे पहिली ते सातवीच्या बालगोपाळांचा दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा झाला.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम व विठ्ठलाचे विविध रूपे असणारी वेशभूषा केली होती.
विठू नामाच्या जयघोषात शाळेतून निघालेली पालखी विठ्ठल मंदिरामध्ये पोहोचली व त्या ठिकाणी शिक्षक व विद्यार्थ्यांनी भजन सादर केले. या सोहळ्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
Comments are closed