पुणे ,दि.२:-  राजारामबापू सहकारी बँकेच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. माजी आ. राजीव आवळे, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, शामराव वाटेगावकर, पी. आर. पाटील, नेताजी पाटील, आर. डी. सावंत, रवींद्र बर्डे, विजयराव पाटील, विजय यादव, बी. के. पाटील, चिमण डांगे प्रमुख उपस्थित होते. अहवालातील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतिक पाटील व उत्कृष्ट शाखा प्रथम क्रमांक फुरसुंगी पुणे पुरस्कार स्विकारताना फुरसुंगी पुणे शाखेचे मुख्य व्यवस्थापक जितेंद्र साळुंखे व इतर मान्यवर

देशातील 30 सहकारी बँकांच्या टॉपच्या यादीत राजारामबापू बँकेचा समावेश आहे. आजपर्यंत सीआयडी, ईडी अशा विविध चौकशा होवून गेल्या, त्याला पारदर्शी कारभारामुळे चोख उत्तर मिळाले आहे. मागील वर्षी दोन व नव्याने दोन शाखांना मंजुरी मिळाली असून लवकरच ५० शाखा होतील असे बँकेचे चेअरमन प्रा.शामराव पाटील यांनी संगितले.

आ. जयंत पाटील म्हणाले, संचालकांनी बँकेला आधुनिकत्वाची झालर लावली आहे. खासगी बँकांच्या बाबतीत वाईट अनुभव येत आहेत पाहिजे तशा सेटलमेंट करतात आपणच कर्जे द्यायची आणि वन टाईम सेटलमेंट करुन प्रकरणे निकाली काढायची असा त्यांचा कारभार सुरु आहे. त्यांना विचारणारे कुणी नसल्याने त्यांची मनमानी सुरु आहे. राजारामबापू बँकेने गेल्या काही वर्षापासून समाधानकारक लाभांश दिला आहे.

सभेप्रसंगी प्रतीक पाटील हे सत्कार करण्यासाठी सरसावले असताना त्यांनी जयंतरावांना नमस्कार घातला. त्यानंतर जयंतरावांनी नमस्कारानेच साथ दिली. पिता-पुत्राच्या कृतीला सभासदांनी जोरदार टाळ्यांची साथ दिली.

सभेसाठी देवराज पाटील, कार्तिक पाटील, सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, संदीप पाटील, संजय पाटील, शैलेश पाटील, संभाजी पाटील, माणिक पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक आर. ए. पाटील यांनी मागील सभेचे प्रोसिडींग वाचन केले. बँकेचे व्यवस्थापकिय संचालक सी.ए. प्रदीप बाबर यांनी अहवाल वाचन केले. संचालक राजेश पाटील यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. कमल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विजयराव यादव यांनी आभार मानले.

उत्कृष्ट कर्मचारी व शाखा

राजारामबापू बँकेचे कर्मचारी नितीन मलगौडी (येडेमच्छिंद्र), अमित पिसाळ (पलूस), अमोल देसाई (साखराळे) यांना उत्कृष्ट कामाबद्दल गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट शाखा फुरसुंगी पुणे, पलूस शाखा, पेठ शाखा यांना सन्मानित करण्यात आले.


 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!