आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनात परिसंवाद संपन्न 

सासवड,दि.१४:-   विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा पाया घातला .१९६० नंतरचा काळ मराठी नाट्यसृष्टीचा सुवर्णकाळ मानला जातो .संगीत रंगभूमीची परंपरा विद्याधर गोखले यांनी सुरू केली ,संगीत रंगभूमी दलित रंगभूमी आणि मराठीच्या नाट्यसृष्टीचा धांडोळा त्यांनी घेतला.अत्रेंनी मराठी रंगभूमीला उर्जितावस्था आणली. अत्रे चतुरस्त्र ,हळव्या मनाचे कलावंत होते. त्यांच्या लेखणीने नाट्यसृष्टी जिवंत ठेवली, असे विचार डॉ. मेधा सिधये यांनी व्यक्त केले.


आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद ,सासवड शाखा यांनी केले होते.
शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरी यांनी प्रायोजित केलेल्या मराठी साहित्य आणि नाटक या विषयावरील परिसंवादाच्या वेळी व्यासपीठावर डॉ. मेधा सिधये ,रवींद्र खरे ,वि.दा. पिंगळे ,प्राचार्य डॉ. धनाजी नागणे ,समन्वयक डॉ. अरुण कोळेकर, वसंतराव ताकवले उपस्थित होते.
याप्रसंगी रवींद्र खरे म्हणाले ,अत्र्यांनी मला खूप प्रभावित केले आहे. नाटक हे चौकटीच्या बाहेर असते. नाटकाची संहिता जपून लिहावी लागते. नाटक नऊ रसांची निर्मिती असते . सगळे जग एका जागी रंगभूमीवर असते. नाट्य हुकमी पद्धतीने निर्माण करता येते,हे आचार्य अत्रे यानी शिकविले. प्रतिभावंत नाटककार अनुभवाचा, स्वप्रतिभेचा आश्रय घेत असतो.. स्वतःशी प्रामाणिक असल्याशिवाय नाटक लिहिता येत नाही.नाटककाराला पात्रांच्या मनातील नाटक लिहिता आलं पाहिजे. मराठी नाटकांतून समाज आणि संस्कृतीचे दर्शन घडत आले आहे. अत्रे ,तेंडुलकर ,कानिटकर ,वि.वा. शिरवाडकर ,राम गणेश गडकरी ,महेश एलकुंचवार , भि.शी. शिंदे, दत्ता भगत यांनी मराठी नाट्यसृष्टी समृद्ध केली .
वि.दा. पिंगळे यांनी नाटकात शब्द आणि संवाद महत्त्वाचे असतात. विजय तेंडुलकर यांनी घाशीरामच्या निमित्ताने एक युग सुरू केले .लोककलेतून लोकरंगभूमी आकारला आली. अनेक लोककला आज अस्तंगत होत आहेत .मनोरंजनासोबत समाज परिवर्तनाचे काम नाटककार करतात. टेक्सास गायकवाड ,भि.शि. शिंदे, दत्ता भगत यांनी दलित रंगभूमीवर दलितांची दुःखे मांडली. जातीयतेवर त्यांनी नाटकातून प्रहार केला. मराठीत विनोदी, ऐतिहासिक ,सामाजिक, राजकीय अशा नाटकांची एक समृद्ध परंपरा आहे ,असे पिंगळे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डाॅ.अरुण कोळेकर यांनी केले.‌स्वागत प्राचार्य डॉ धनाजी नागणे यांनी तर आभार वसंत ताकवले यांनी केले.
याप्रसंगी विजय कोलते, अण्णासाहेब खाडे ,शांताराम पोमण ,संदीप टिळेकर ,सुनीताराजे पवार, बंडूकाका जगताप ,सतीश पाटील, बबुशेठ माहुरकर ,दिलीप निरगुडे ,शशिकला कोलते ,उपप्राचार्य डॉ बेबी कोलते , विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

 


 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!