😃 सिजनेबल समाजसेवा उफाळून आल्याचीही विनोदी चर्चा 😃
🗳️ विधानसभा, महानगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होणार असल्याची पुसटशी कल्पना आल्याने शहरातील राजकीय स्वयंघोषित समाजसेवकांना आता नेतेपदी विराजमान होण्याची दिवा स्वप्न पडू लागली आहेत.
⛱️🎇🎑 केवळ फोटो बाजी न करता प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलवर काम करणारा नेता कोण? हे जनताच ठरवणार.
पुणे तथा पिंपरी चिंचवड शहरांमध्ये मागील काही वर्षात गायब असलेले चेहरे अचानक फ्लेक्सच्या माध्यमातून चौका चौकात झळकू लागले आहेत तर नवीन चेहऱ्यांना आपणच भावी राजकीय नेते बनणार असल्याचे वाटत असल्याने त्यांनीही कंबर कसल्याचे चित्र दिसून येते मात्र प्रत्यक्षात जनतेचे वाली समजू लागलेल्या अशा भावी नेत्यांनी नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी कितपत कार्य केले असे प्रश्नचिन्ह नागरिकांतून उपस्थित होते आहे.
अशा भावी स्वयंघोषित भावी नेतेमंडळींना असे वाटते की वाढदिवसाच्या, लग्न समारंभाच्या,मयत,दहावा,तेरावा, डोहाळे जेवण यांच्या निमित्तान उपस्थित राहून आपली हजेरी लावल्याने लोकांच्या नजरेत आपण मोठे नेते बनतो.मतांची गोळा बेरीज करता येते असाही एक गोड गैरसमजही यांच्यात असतो तसेच अशा कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याने आपला सामाजिक कार्याचा वाटा किती मोठा आहे हे दाखवण्याचा एक मार्ग उपलब्ध होतो.
तर वर्षानुवर्षे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या दारी जाणारी शहरातील नेते मंडळी ही बोटांवर मोजणे इतकीच आहे.
त्यामुळे कोरोना काळापासून गायब झालेल्या मंडळींना आलेली राजकीय जाग पाहून नागरिकांमध्ये विनोदी वातावरण निर्माण झाले आहे. दर काही नागरिकांकडून स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे तर काहींकडून हा सिजनेबल छत्री कार्यक्रम असल्याची टीकाही होत आहे तर काही नागरिक म्हणतात आता प्रत्येक सणाला घरोघरी भेटवस्तू, पार्ट्या मिळतील तसेच मोठमोठी आश्वासनांची गाजरंही मिळतील .
प्रत्यक्षात काम होतील न होतील मात्र अशा पद्धतीने सजावट रंगरंगोटी ही पुढील काही महिने पाहायला मिळणार हे नक्की.
📌 काय आहे जनतेचे मत 👉
लॉकडाऊन मध्ये व्यवसाय, नोकरी, कुटुंब व्यवस्थाच अडचणीत आल्याने नागरिकात प्रचंड भीती होती अशावेळी नेतेमंडळींकडून नागरिकांना मदतीची अपेक्षा होती. काही ठराविक नेते मंडळींकडून मोठे मदत कार्य झाले. ते नागरिक जाणतात तर दुसरीकडे केवळ जाहिरातबाजी , फ्लेक्सबाजी करून, छोटे-मोठे इव्हेंट करून आपण किती महान कार्य केले असे दाखवण्याची चढाओढ नागरिकांना पसंत नाही.
शहरातील काही भागात असलेली रस्त्यांची दुरावस्था पाण्याची कमतरता व उद्यानांची असलेली कमी, दुरावस्था, वाहतूक समस्येचा उडत असलेला बोजवारा हाही महत्त्वाचा असून तो सोडवण्यासाठी कोणता राजकीय नेता पुढे आला असाही प्रश्न नागरिकांतून उपस्थित.
निवडणुकांमध्ये महत्त्वाच्या ठरणाऱ्या विशेष बाबी
लॉकडाऊन मध्ये केलेल्या मदतीची जाण अथवा न केलेल्या मदतीची उणीव लोक मतांमधून व्यक्त करू शकतात.
केवळ निवडणुका लक्षात ठेवून घेतलेले कार्यक्रम नागरिकांना फायद्याचे वाटतातच असे नसल्याने ठराविक जाणकार वर्गाचा मतदानावर प्रभाव राहणाची शक्यता.
रोजगाराचा तसेच व्यवसायात मदतीचा हात देणारा नेता लोकांच्या जवळ राहणार असेही चित्र असू शकते.
स्थानिक पातळीवरचे प्रश्न ही नागरिकांसाठी महत्त्वाचा विषय ठरु शकतात
शहरात वाढत असलेली वाहतूक समस्या व उपायोजना उदाहरणार्थ हिंजवडी चाकण अशा मार्गांवर होणारे प्रचंड ट्राफिक याचाही रोष मतदानात दिसू शकतो
आधार कार्ड, पॅन कार्ड अशा सर्वसाधारण उपक्रमांपेक्षा महत्त्वाच्या कामकाजांवर लक्ष देऊन मांडणी करणारा राजकीय नेता लोकांना अधिक भावण्याची शक्यता
इतिहासापेक्षा भविष्याचा वेध घेऊन वर्तमान काळात विविध कार्य करत स्वतःचे नेटवर्क असणाऱ्या नेत्यास युवा वर्गाची ही पसंती राहण्याची शक्यता
पिंपरी चिंचवड शहरात व पुणे शहरात निवडणुकांमध्ये गावचा तथा बाहेरचा हा उमेदवारांसाठी कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता
Comments are closed