पिंपरी, दि.१४ :- लायन्स चॅरिटेबल सर्व्हिस फाउंडेशन तर्फे लायन्स क्लब ऑफ पुणे श्री क्षेत्र देहुगाव येथे संचालित डेंटल क्लिनिक यांच्याद्वारे इंदोरी जिल्हा परिषद शाळा येथे धनश्री काशीद (ग्रा पं सदस्या) यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांकरीता फ्री डेंटल चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी दातांची स्वच्छता दररोज करावी व खराब झालेल्या दातांवरती तत्काळ उपचार करावे याविषयी डॉ.अमोल वाहूरवाघ व डॉ.अमरजीत तोगरे यांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच त्यांची मोफत दंत तपासणी केली. आणि ज्या विद्यार्थ्यांचे दात खराब आहेत व ज्यांना दातांच्या पुढील उपचाराची गरज आहे यांना देहू येथील डेंटल क्लिनिक मध्ये सवलतीच्या दरामध्ये उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एकूण 400 च्या आसपास विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाकरिता देहु लायन्स क्लब अध्यक्ष ला.विवेक काळोखे उपाध्यक्ष ला. संदीप परंडवाल, ला. सचिव अहिरे, ला.नारायण ब्रम्हा, संदीप घाडगे व इंदोरी गावचे सामाजिक कार्यकर्ते सचिन काशीद, आण्णासाहेब भेगडे, शशिकांत शिंदे सरपंच इंदोरी, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, प्राचार्य विठ्ठल चव्हाण, केंद्रप्रमुख भगवंत बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
निवडणूकीचे वारे अन् शहरात राजकीय छत्र्यांची लक्षणीय वाढ .
विचारांची आणि भावनांची घुसळून नाटकात – डाॅ. मेधा सिधये
Comments are closed