पिंपळे गुरव :- जनता शिक्षण संस्थेचा 72 वा वर्धापन दिन व गुरुवर्य बा. ग जगताप यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा दि. 17 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य जयप्रकाश जगताप आणि प्रमुख पाहुणे आमदार जयंत आसगावकर व मा. आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी आमदार आसगावकर म्हणाले,बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने या संस्थेचे सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या जनता शिक्षण संस्थेवर असणाऱ्या निष्ठेमुळेच या संस्थेची भरभराट झाली आहे.
शासनाने पुरस्कारापासून वंचित ठेवल्याची खंत.
आचार्य अत्रे यांनी गुरुवर्य यांना महाराष्ट्राचे रत्न संबोधले होते. असे निस्वार्थपणे काम करणारे व स्वतःची पदरमोड करून संस्था चालवलेल्या गुरुवर्य जगताप यांच्या घराण्याला शासनाने पद्मश्री वा पद्म पुरस्काराने वंचित ठेवल्याची खंत त्यांचे नातू जयप्रकाश जगताप यांनी यावेळी व्यक्त केली.
मा.अध्यक्ष प्राचार्य जयप्रकाश जगताप यांचे ‘चित्र रचनेतील आकार व अवकाश मुल्यांचा शोध’ हे पुस्तक प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
यानिमित्ताने
1) गुरुवर्य बा.ग.जगताप आदर्श शिक्षक पुरस्कार 2024- प्रा.शिवाजी गोरे ( दापोडी प्रशाला)
2) दादासाहेब जगताप आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 सुभाष दाभाडे (मुख्याध्यापक म्हाळुंगे प्रशाला)
3) जयंती (माईसाहेब) आदर्श शिक्षिका पुरस्कार 2024 देशमुख गायत्री (औंध प्रशाला)
यांना आदर्श शिक्षक पुरस्कार पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला
अध्यक्ष मा.प्राचार्य जयप्रकाशजी जगताप यांच्या हस्ते दहावी आणि बारावी प्रथम विद्यार्थ्यांना 11000 रुपयाचे रोख बक्षीस देण्यात आले. तसेच दादमाई विचारमंचाचे समर्थक अतुल क्षीरसागर यांच्याकडून दहावी आणि बारावी प्रथम विद्यार्थ्यांना 11000 रुपयाचे बक्षीस देण्यात आले.
दादामाई विचार मंचाच्या वतीने आंबळे येथील नूतन इमारत बांधकामास 5,55,555 रुपयाचा धनादेश अध्यक्षांकडे देण्यात आला. डॉ. सोमनाथ दडस यांचेकडून 5 लाख, प्रा. सिद्धार्थ कांबळे 11000 रुपये, दादा वाघमारे 51000 रुपये धनादेश यानिमित्ताने आंबळे प्रशालेतील बांधकामास देण्यात आला.
तसेच दहावीचा शंभर टक्के निकाल लावल्या बद्दल संस्थेच्या वतीने नवी सांगवी येथील एस.जे.एच गुरुनानक हायस्कूल प्रशालेचा सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. जयप्रकाश जगताप, उपाध्यक्ष रमेश कार्ले, कार्याध्यक्ष महेशकुमार आगम, खजिनदार कविता गोरे, जनरल सेक्रेटरी प्रा.सुभाष जावळे, जॉईट सेक्रेटरी रवींद्रनाथ नवले, असिस्टंट सेक्रेटरी राजेंद्र खरमाटे, प्रा.प्रदीपकुमार नागवडे ,ग्रामीण संचालक हेमंत तांबे , बाळासाहेब पौळ व संस्थेचे तहहयात सभासद ,जगताप कुटुंबातील रणजीत जगताप, धैर्यशील जगताप, श्रीमती ज्योतीताई जगताप , विरेन जगताप , माजी जनरल सेक्रेटरी लालासाहेब भुजबळ, माजी सहसचिव वसंतराव जगदाळे, माजी प्राचार्य सुदाम हिरवे, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य ,पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे जनता शिक्षण संस्थेतील माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी इ. उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन श्री.शिवाजी विद्यामंदिर औंध प्रशालेने केले . प्राचार्य काळेल ,उपप्राचार्य खामकर , पर्यवेक्षिका सोनवणे आणि औंध प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे राजू रघावंत आणि अशोक गोसावी व इतर सहकारी शिक्षक यांनी सहकार्य केले.
राजेश लगड यांनी सूत्रसंचालन केले, प्रास्ताविक रवींद्रनाथ नवले यांनी तर महेश आगम यांनी आभार मानले.
निवडणूकीचे वारे अन् शहरात राजकीय छत्र्यांची लक्षणीय वाढ .
विचारांची आणि भावनांची घुसळून नाटकात – डाॅ. मेधा सिधये
Comments are closed