पिंपरी ,दि.२६ : – खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवड पुणे परीसर यांच्या तर्फे नुकताच मंडळांचा २६ वा वर्धापन दिन, कौटुंबिक मेळावा,व गुंणवत विद्यार्थी सोहळा मोठ्या थाटामाटात संप्पन झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे येथील विपश्यना केंद्रप्रमुख डॉ. दत्ता कोहीनकर, पुणे म.न.पा.चे.माजी नगरसेवक काका चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात डॉ.कोहीनकर यांनी विद्यार्थी व पालक यांना मेडीटेशन चे महत्व पटवून दिले तर काकासाहेब चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणात विशेषता मुलींच्या शिक्षणासाठी जे कार्य केले त्याचप्रमाणे आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य केले पाहिजे व मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे व निर्भयपणे जीवन जगले पाहिजे अश्या चांगल्या प्रकारचे महिलांना व गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मंडळाचे माजी अध्यक्ष पि के महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष नानाभाऊ माळी, सूत्रसंचालन मंडळाचे सचिव नकुल महाजन व दिपाली वाघ यांनी केले. आर्थिक अहवाल खजिनदार रमेश बिरारी यांनी सादर केला. पाहुण्यांचा परिचय खुशाल शेवाळे यांनी केला. आभार प्रदर्शन ज्येष्ठ सभासद मुकुंदा महाजन यांनी केले. कार्यक्रमाला शंभर पेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थ्यांचा मंडळातर्फे प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व रोख स्वरूपाची बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे दीपक बागुल, केशव सैंदाणे, महेश बाविस्कर, सुधाकर बोरसे, सुनील शांताराम महाजन, सुजीत महाजन, अशोक महाजन,खुशाल खैरनार, जयेश वाघ, नवल खैरनार, गोविंद माळी, रमेश सोनवणे, गणेश चौधरी, उदयभान पाटील, ज्ञानेश्वर वाघ, सुधीर महाजन, प्रशांत महाजन,डी.के.माळी, नितीन देवरे, वधुवर समितीचे अध्यक्ष योगेश माळी, उपाध्यक्ष रवींद्र माळी, विकास महाजन, एस डी माळी, प्रवीण महाजन, ज्ञानेश्वर महाजन, उद्धव महाजन, रतन माळी , भाग्यश्री अहिरे, योगेश माळी यांनी अथक परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
खान्देश माळी मंडळाच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाला उपस्थित महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, काका चव्हाण व इतर मान्यवर
जनता शिक्षण संस्थेचा 72 वा वर्धापन दिन आणि गुरुवर्य बा. ग. जगताप यांची 136 वी जयंती साजरी.
लायन्स क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी
Comments are closed