पिंपरी ,दि. २६ :- भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालयात, गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य देशमुख दिलीप, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जाधव संजय, माध्यमिक विभागाचे उप प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कोकणे, पालक संघाच्या उपाध्यक्ष सारिका लोंढे, सहसचिव शायनाज गवंडी व सपना पवार, स्नेहल धाईंजे पालक प्रतिनिधी यांनी दहीहंडीचे पूजन करून उत्सवाला सुरुवात केली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राधा व कृष्णाची वेशभूषा केली होती. यावेळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी दुधापासून बनवलेले पदार्थ यांचे प्रदर्शन भरवले. यात दही, तूप, लोणी, बर्फी, ताक, श्रीखंड, खरवस, पनीर, चीज, रसमलाई, बासुंदी, रसगुल्ले, पेढा, कलाकंद, खवा व लस्सी असे विविध पदार्थ विद्यार्थ्यांनी घरून बनवून आणले होते. या सर्व पदार्थांचे प्रदर्शन प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर ठेका घेत नृत्य सादर करत उत्सवाच्या आनंद घेतला. बालवाडी ते चौथीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला, शेवटी इयत्ता चौथीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी एकत्रित प्रयत्न करून समानतेचा संदेश देत दहीहंडी फोडली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती माने सायली यांनी केले. वाडेकर स्नेहलता यांनी विद्यार्थ्यांना गोष्टी रूपाने श्रीकृष्णाच्या बाललीला सांगितल्या आणि शेवटी बर्वे शैला यांनी कार्यक्रमाची सांगता करताना आभार प्रदर्शन केले. या संपूर्ण उत्सवाचे आयोजन यशस्वी होण्यासाठी सावंत दीपिका, धिवार अरुणा, विलास गुंजाळ, बोरसे प्रदीप, अपर्णा कुमठेकर, जाधव सुवर्णा, भोईर भाग्यश्री, अमोलिक सविता व प्रणाली खंडागळे यांनी परिश्रम घेतले.
जनता शिक्षण संस्थेचा 72 वा वर्धापन दिन आणि गुरुवर्य बा. ग. जगताप यांची 136 वी जयंती साजरी.
खान्देश माळी मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थी सोहळा व स्नेहमेळावा संपन्न.
लायन्स क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी
Comments are closed