मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर आज बुधवारी याच किल्ल्यावर जोरदार राजकीय राडा पाहायला मिळालाय. या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर आले होते. मात्र नेमक्या याचवेळी तिथे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे हेदेखील आपल्या समर्थकांसह पोहोचले.

दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले. तर बघता बघता शाब्दिक चकमक थेट धक्काबुक्की आणि हाणामारी पर्यंत जाऊन पोहचल्याचे बघायला मिळाले.

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!