शक्ती व भक्तीचे अनोखे मिश्रण देखाव्यातून सादर.
आयोजक – पैलवान सुमित अरविंद भोसले (आंतरराष्ट्रीय खेळाडू ) व समस्त ग्रामस्थ सांगवी पिंपरी चिंचवड पुणे 27
सांगवी, दि. १ :-पिंपरी चिंचवड येथील सांगवीतील मार्तंड आखाडा सांगवी येथे श्रावणी पूजे निम्मित महादेवाची पिंड बनवण्यात अली होती यावेळी तालमीतील खेळाडूंनी मिळून मातीची पूजा बनवली. त्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर हनुमंताला मातीने हुबेहूब रूप दिले .तसेच लॉस एंजेल्स येथे होणाऱ्या पुढील ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्या पुढे ठेऊन मिशन ऑलिम्पिक २०२८ ची रांगोळी रेखाटण्यात आली आहे.
यावेळी भारत केसरी विजय गावडे पुणे केसरी समीर कोळेकर, मुंबई महापौर केसरी देवेंद्र पवार यांनी कुस्ती संकुलास भेट दिली यावेळी माजी नगरसेवक अतुल शितोळे उपस्थित होते. कार्यक्रमास आस्वाद सोनार यांचे मार्गदर्शन लाभले .
पैलवान सुमित भोसले या तालमीचे वस्ताद आहेत . सुमित याने कजाकिस्थान येथे झालेल्या अंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ८४ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळून दिले आहे असूननुकत्याच श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी भारताचा कुस्ती कोच म्हणून देशाचे प्रतिनिधीत्व केले आहेत.
तसेच या आखाड्यात स्वतः नवीन कुस्तीपटुंना मार्गदर्शन करत आहेत. हरियाणा येथे झालेल्या ११व्या स्टुडन्ट ऑलिम्पिक गेम्स २०२४ या स्पर्धेत गौरव पाटोळे, अथर्व गोडांबे व ओम निंबाळकर यांनी कांस्य पदक जिंकले होते. या तालमीत सध्या 5० पेक्षा जास्त मल्ल सर्व करत आहेत.
Comments are closed