पिंपरी, दि. ७ :- यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक वातावरणात पार पाडण्यासाठी शहरात पहिल्यांदाच मुर्ती विघटन केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने हा पुढाकार घेतला असून क्षेत्रीय कार्यालयनिहाय ४०फूट बाय ३०फूट आकाराची आणि ५ फूट खोल अशी एकूण १५ भव्य विघटन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या विघटन केंद्रांवर पहिल्यांदाच गणेशमूर्तींचे रासायनिक प्रक्रियेद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. तसेच नदी व तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी मुर्ती संकलन केंद्रांमध्ये गणेशमूर्तींचे दान करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त सिंह यांनी केले आहे. 

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करण्याबाबत तसेच शहरातील नदी व तलावांचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या मुर्ती संकलन केंद्रावर मुर्ती दान करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. तसेच संकलन केंद्रांवर प्राप्त झालेल्या मुर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यासाठी राष्ट्रीय केमिकल अॅड फर्टिलायझर लिमिटेड या संस्थेमार्फत अमोनियम बाय कार्बोनेट हे रसायन उपलब्ध करून घेण्यात आले आहे. हे रसायन योग्य प्रमाणात वापरण्याबाबत पर्यावरण विभागामार्फत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर संकलन केंद्रांवर प्राप्त मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विघटन करण्यात येणार आहे. पर्यावरण विभाग व क्षेत्रीय कार्यालय यांच्या समन्वयाने विघटन केंद्र प्रक्रिया होणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्तीचे विसर्जन होणार नाही, याची दक्षता क्षेत्रीय स्तरावर घेण्यात येणार आहे. तसेच विविध उपक्रमांद्वारे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. कृत्रिम विसर्जन घाटांवर विसर्जनाकरीता आवश्यक पाणीपुरवठा तसेच विद्युत व्यवस्था व आरोग्य व्यवस्था पुरविण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त, कृत्रिम हौदाच्या ठिकाणी संकलित होणारे निर्माल्य गोळा करून त्याची मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रामध्ये प्रक्रिया करून त्याद्वारे कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. तसेच गणेश मूर्तीचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन झाल्यानंतर निर्माण होणारा गाळ पुनर्निर्मित होणारे माहित्य तयार करण्यासाठी मोशी येथील सी एन्ड डी वेस्ट प्लॅन्टवर पाठविण्यात येणार आहे. तर गणेशोत्सवाच्या काळात शहरामध्ये कोठेही ध्वनी तसेच वायू प्रदूषण होणार नाही याबाबत क्षेत्रीय स्तरावर दक्षता घेण्यात येत असून आवश्यकतेनुसार पोलीस विभागाची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली आहे.

 

क्षेत्रीय कार्यालयनिहाय गणेशमुर्ती विघटन केंद्रांची ठिकाणे – 

 

अ क्षेत्रीय कार्यालय – 

१) नियोजित महापौर निवास, से. नं. २४ निगडी प्राधिकरण, 

२) मोहननगर सांस्कृतिक भवन

 

ब क्षेत्रीय कार्यालय – 

१) सर्व्हे नं. ९४, म्हस्के वस्ती रोड, रावेत, सागर मेडिकलजवळ  

२) केशवनगर जुनी शाळा पटांगण, चिंचवड

 

क क्षेत्रीय कार्यालय –

१) एच. ए. मैदान, नेहरुनगर, पिंपरी

 

ड क्षेत्रीय कार्यालय – 

१) कोहिनुर सफायर समोर, ताथवडे 

२) शिल्पा हॉटेल शेजारी, डी पी रोड पिंपळे निलख

 

ई क्षेत्रीय कार्यालय – 

१) डोळस मैदान, दिघी

२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान समोरील मैदान

 

फ क्षेत्रीय कार्यालय – 

१) टाऊन हॉल, घरकुल, चिखली

२) टाऊन हॉल, सोनवणे वस्ती, चिखली

 

ग क्षेत्रीय कार्यालय –

१) वैभव नगर, पिंपरी

२) राघवेंद्र स्वामी मठासमोर, मनपा आरक्षित जागा, थेरगाव 

 

ह क्षेत्रीय कार्यालय –

१) एच. ए. ग्राऊंड, संत तुकाराम नगर

२) काळूराम जगताप बँडमिंटन हॉल शेजारील मैदान पिंपळे गुरव.

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!