पिंपरी ,दि.२१ :- पिंपरी चिंचवड महापालिका व मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) पिंपरी चिंचवड व मराठवाडा भूमिपुत्र यांच्या संयुक्तपणे ७६ वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, वृक्षमित्र अरुण पवार यांनी पिंपळे गुरवसारख्या ठिकाणची मुख्य जागा मराठवाडा भवनसाठी दान केली. आज तुकड्या तुकड्यासाठी वाद होत असताना अरुण पवार यांनी मराठवाडा भवनसाठी ५ ते ६ कोटी रुपयांची जागा दान करणे ही महाराष्ट्रासमोरचा आदर्श आहे, असे गौरवोद्गार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी काढले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, स्वामी रामानंद तीर्थ, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्य सेनानी गोंविदभाई श्रॉफ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.भाऊसाहेब जाधव, महसूल सहायक जिल्हाधिकारी उन्मेश मुळे, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मराठवाडा मुक्तीसंग्राम या विषयावर शिवकीर्तनकार प्रा.डॉ. गजानन वाव्हळ महाराज यांचे व्याख्यान, स्वातंत्र्य, लोकशाही आणि वर्तमान या विषयावर प्रा. गंगाधर बनबरे यांचे व्याख्यान, तसेच महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त नवनिर्वाचित खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, खासदार श्रीरंग बारणे यांचा संत तुकाराम महाराज पगडी, उपरणे, भक्ति-शक्ति प्रतिक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणाले, की अरुण पवार यांचा दानशूरपणा ही मराठवाड्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. व्यवसाय करत असतानाही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मराठवाडा वासियांचा विचार केला आहे. त्यापुढे जाऊन त्यांनी आजपर्यंत 50 हजार झाडे लावून त्याचे संगोपन केले आहे. एका व्यक्तीने समाजासाठी दहा गुंठे जागा देणे म्हणजे खूप मोठे कौतुकास्पद आहे. त्यांना यासाठी कुटुंबाची मोठी साथ मिळाली, हे महत्त्वाचे आहे.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, की आमचे वडील मोहनराव पाटील (सबनीस) हे क्रांतिकारक होते. निलंगा तालुक्यातील हाडोळी येथील गढीवजा घरास रझाकारांनी वेढा दिला होता, तेव्हा त्यांनी रझाकारांविरोधात लढा दिला. तसेच अनेक महापुरुष, महिलांनी संघर्ष करून मराठवाडा मुक्ती संग्राम यशस्वी केला.
दरम्यान, मराठवाडा भवन बांधकामासाठी गोरख भोरे, सुदर्शन यादव, बाळासाहेब काकडे, धनाजी येळकर पाटील, युवराज माने, सुर्यकांत चव्हाण, अभिमन्यु पवार, केशव बोधले, दत्ता म्हेत्रे या दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे.
यावेळी प्रकाश इंगोले, छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, उद्योजक शंकर तांबे, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नरेंद्र माने, डॉ. ऋतुराज कदम, बळीराम माळी, सुवर्णा इंगोले, मनोज मोरे, अभिमन्यु पवार, युवराज माने, सुर्यकांत कुरुलकर, गोपाळ माळेकर, माजी नगरसेवक गोरक्षनाथ लोखंडे,संदीप राठोड,भिमाशंकर भोसले, अनुराधा पवार, शारदाताई मुंडे, बाळासाहेब साळुंके, अनिताताई पांचाळ, विठ्ठल नवाने, जीवन बोऱ्हाडे, दत्तात्रय धोंडगे, हरिभाऊ घायाल, अतुल होळकर, शशिकांत दुधारे, वामन भरगंडे, किशोर पाटील, भास्कर सुर्यवंशी, राजेंद्र मोरे, अभिमन्यु गाडेकर, अनुराज दुधभाते, आण्णा जोगदंड, सुग्रिव पाटील, किशोर आटरगेकर, विजय वडमारे, तेजस काळे, प्रविण कदम, आनंद टेकाळे, सचिन स्वामी, संदिप शिंदे, बळीराम कातंगळे, सुरेश सकट, दिनेश पवार, मारुती आरवडकर, सोमेश्वर झुमके, मुंजाजी भोजने, शिवाजी घोडके, रमेश जाधव, उद्धव सानप, गणेश ढाकणे, हनुमंत घुगे,बालाजी पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!