• जेजुरीच्या पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापनदिन संपन्न.
जेजुरी ,दि.२४ :- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणे, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली .स्वावलंबन ,चारित्र्यवर्धन आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा समन्वय शिक्षण पद्धतीत घडवून आणण्यासाठी म. गांधीच्या जन्मशताब्दी वर्षापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालय अंतर्गत राबवली जाते. सामाजिक बांधिलकी, नेतृत्व गुण , राष्ट्रीय एकात्मता यासाठी विद्यार्थ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवून आपले व्यक्तिमत्व समृद्ध आणि संपन्न करावे, असे आवाहन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अरुण कोळेकर यांनी केले.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचा २४ सप्टेंबर हा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला .
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ. धनाजी नागणे, उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अरुण कोळेकर, प्रा. चंद्रशेखर काळे, प्रा.गौरी फडतरे ,प्रा. पूनम कुदळे, प्रा.नेत्राली काकडे इ.मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. धनाजी नागणे यांनी राष्ट्रीय सेवा योजना एका अर्थाने सामाजिक काम करण्याची चळवळ आणि व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करुन विद्यार्थ्यांनी आपल्या मधील नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीचा विकास करावा, असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. चंद्रशेखर काळे, आभार प्रा.पूनम कुदळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.गौरी फडतरे यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी – विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.
Comments are closed