जेजुरी,दि.२५:- आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरच्या ,जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयास विप्रा स्किल इंडिया प्रा.लि. ,पनवेल या कंपनीकडून २७ संगणक व २८ लॅपटॉप भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले.
ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संगणक साक्षर व्हावे , या उद्देशाने कंपनीचे प्रमुख विकास चव्हाण यांनी महाविद्यालयाच्या संगणक कक्षाची गरज ओळखून या वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या. यानिमित्त भेटवस्तू प्रदान कार्यक्रम महाविद्यालयात संपन्न झाला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी नागणे, उपप्राचार्य बेबी कोलते, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुलांची गरज ओळखून विप्रा.स्किल इंडिया प्रा. लि.पनवेल या कंपनीने प्रमुख श्री विकास चव्हाण यांनी ही भेट दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते ,प्राचार्य डॉ. धनाजी नागणे ,सचिव शांताराम पोमण यांनी आभार मानले आहेत.
Comments are closed