जेजुरी ,दि.२५ :- पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या अंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरीचा हर्षल उद्धव पाटील प्रथम क्रमांकाने विजयी झाला.
त्याची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिर्डी येथे दि. २७ ते २९ सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या अंतर विभागीय स्पर्धेसाठी अभिनंदन निवड झाली.
हर्षलला प्रा. डॉ. शिवाजी भिंताडे शारीरिक शिक्षण संचालक यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी नागणे, उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते सर्व स्टाफ, विद्यार्थी यांनी हर्षल चे अभिनंदन केले.
Comments are closed