पिंपरी ,दि.३ :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी गाव ते डेअरी फार्म उड्डान पूलाचे काम पूर्ण होत आले आहे, तरी त्या पूलाला संत शिरोमणी सावता महाराजांच्या अद्यात्मिक कार्याची दखल म्हणून त्याचे नाव “संत शिरोमणी सावता महाराज” उड्डान पूल असे करण्यात यावे अशी विनंती सर्व सावता महाराज भक्त, पिंपरी चिंचवड महात्मा फुले समता प्रतिष्ठान, आणि पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
या संदर्भात महात्मा फुले समता प्रतिष्ठान आणि पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
Comments are closed