“चला एकत्र येऊया.. आपल्या घरातील आमदार करूया” मोरेश्वरभाऊ भोंडवे यांच्यासाठी रावेत ग्रामस्थांची एकजूट…

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघात आपल्या घरातील माणूस मोठ्या पदावर गेल्यानंतर आपल्या गावाला व आपल्या चिंचवड विधानसभेला नक्कीच फायदा होणार आहे. यासाठी “चला एकत्र येऊया.. आपल्या घरातील आमदार करूया” या निर्धाराने माजी नगरसेवक मोरेश्वरभाऊ भोंडवे यांना आमदार करण्यासाठी रावेत मधील सर्व ग्रामस्थ एकत्रित बैठक घेवून एकजुटीचा निर्धार केला आहे. रविवारी (दि 20) रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे बैठक संपन्न झाली.यावेळी पोलीस पाटील दिवानजी भोंडवे,माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, बांधकाम व्यावसायिक नंदकुमार भोंडवे,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर संघटक चिंचवड विधानसभा दिलीप भोंडवे, बांधकाम व्यावसायिक ऋषिकेश भोंडवे,नरेंद्र सोनटक्के,गणेश सोनटक्के,किरण जाधव,प्रकाश जाधव,डॉ गणेश जाधव,दीपक जाधव, राजू म्हस्के,संतोष शिंदे,सुजित भोंडवे,हभप जनार्धन शेळके,हभप दत्तात्रय भोंडवे,हभप विकास पालेकर,माटे, तुपे परिवारातील सदस्य यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी आदी सह बहुसंख्येने रावेत ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बांधकाम व्यावसायिक नंदकुमार भोंडवे म्हणाले की,रावेत परिसराचा विकास अतिशय नियोजनबद्ध झाला आहे. आपल्या रावेत परिसराचा नावलौकिक शहरात नव्हे संपूर्ण देशात आपल्या मोरेश्वरभाऊ भोंडवे यांच्या नेतृत्वाने मिळालेला आहे. कोणताही भेदभाव न राखता सामान्य माणसाची कामे करण्यासाठी भाऊ यांचा नेहमी पुढाकार राहिलेला आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखदुःखात मोरेश्वरभाऊ भोंडवे स्वतः उभे राहतात. दिवसातील २४ तासात केव्हाही गरजू लोकांच्या हाकेला धावतात. आपला परिसर सोडून संपूर्ण शहरातील कोणत्याही नागरिकांच्या समस्या भाऊ प्रत्यक्ष फोन द्वारे किंवा आपले कार्यकर्ते पाठवून सोडवतात. एखाद्या कौटुंबिक वादाला सोडवून समेट घडवून नाती घट्ट करतात. अनेकांची नाती तुटू नये यासाठी मोरेश्वरभाऊ भोंडवे यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे. आपल्या परिसरातील नव्हे घरातील माणूस “आपला माणूस” चिंचवड विधानसभा निवडणुकीत आमदार होण्यासाठी दोन पावले दूर राहिले होते. आता विधानसभेसाठी संधी आली आहे.आता आपल्याला संधीचे सोने करून आपला माणूस आमदार करण्यासाठी एकत्रित येऊया यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिक, युवक आणि रावेत ग्रामस्थांनी ग्रामदैवत श्री धर्मराज महाराज यांच्या साक्षीने मोरेश्वरभाऊ भोंडवे यांना विधानसभेसाठी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी मोरेश्वरभाऊ भोंडवे म्हणाले की, माझ्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मागील दहा वर्षात आपल्या सर्व ग्रामस्थ, युवक मित्र, महिला यांनी भरघोस मतांनी विजयी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.आता चिंचवड विधानसभेसाठी पुन्हा आपण सर्वांनी आणि मतदार संघातील नागरिकांनी मला विश्वास दिला आहे.त्यामुळे आपण विजयाच्या अगदी जवळ पोहोचणार आहे. यापुढे सर्व ग्रामस्थांनी आपले नातेवाईक व मित्र परिवार यांच्या संपर्कात राहून लढाई देऊन विजय संपादन करायचा आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊया असे आवाहन मोरेश्वरभाऊ भोंडवे यांनी केले.

त्याचबरोबर आपण महापालिकेच्या माध्यमातून रावेत परिसराचा विकास ज्या पद्धतीने केला. त्याच पद्धतीने आगामी काळात संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे. रावेतचा विकास करताना लोकांचा एक प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि संधीचे सोने करता आले. तसेच यापुढे चिंचवड विधानसभा मतदारसंघात विजयी होण्यासाठी तुम्हा सर्वांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!