जेजुरी : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान चालवीत असलेले जेजुरीचे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय सभोवतालच्या सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, संशोधन आणि राजकीय बदलाचे केंद्र बनेल ,असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केला.
निमित्त होते नुकतेच बंगळूर येथील राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक) कडून महाविद्यालयाचे मूल्यांकन झाले. या मूल्यांकनाच्या आधारे नॅककडून महाविद्यालयाला ब दर्जा देण्यात आला.
त्यानिमित्त आयोजित केलेल्या महाविद्यालयीन कर्मचारी गौरव समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते , सहसचिव बंडू काका जगताप ,प्राचार्य डॉ.धनाजी नागणे , नॅक समन्वयक डॉ. बालाजी नाटकरे, उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते ,सहसचिव गौरव कोलते ,प्रा. डॉ.अरुण कोळेकर आदी उपस्थित होते.
नुकतीच नॅक पीअर टीमने महाविद्यालयाला भेट दिली होती. त्यामध्ये अध्यक्ष डॉ.थारकेश्वर व्ही.बी.( तेलंगणा) समन्वय सदस्य डॉ. अश्विनी पुरोहित (गुजरात )सदस्य डॉ.नलप्पण रमण( तामिळनाडू) यांचा समावेश होता. त्यांनी नॅकच्या क्रायरेटरीयाच्या आधारे प्रत्यक्ष पाहणी करून मूल्यमापन केले. त्या आधारे नॅक कडून बी मानांकन प्राप्त झाले.
कार्यक्रमात बोलताना विजय कोलते पुढे म्हणाले, नॅकने दिलेल्या ब श्रेणीमुळे आम्हांला आनंद झाला आहे. त्याबद्दल त्यांनी नॅक आणि पिअर टीमचे आभार मानले. त्यांनी सुचवलेल्या त्रुटी दूर करून भविष्यात महाविद्यालय अधिक सक्षमपणे काम करेल असे सांगितले.
याप्रसंगी प्रा. डॉ.धनाजी नागणे, डॉ. बालाजी नाटकरे, उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते यांचा सत्कार विजय कोलते यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांनी कौतुक आणि प्रशंसा केली.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.धनाजी नागणे यांनी आपल्या मनोगतांतून महाविद्यालयाने या काळात विद्यार्थांसाठी केलेल्या सुविधांचा ,शैक्षणिक,आणि सहशिक्षण कार्यासंबंधीचा आढावा घेतला.नॅकने केलेल्या सकारात्मक गुणांचा आणि भविष्यातील दिशेचा त्यांनी अहवालातून सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष,सर्व पदाधिकारी , प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक इत्यादी घटकांनी केलेल्या सहकार्यामुळे महाविद्यालय बी श्रेणी प्राप्त करु शकले असे सांगितले.
प्रस्ताविकाच्या रूपाने डॉ.बालाजी नाटकरे यांनी समन्वयक म्हणून केलेल्या कामकाजा संदर्भात आणि मिळालेल्या श्रेणी बद्दल माहिती दिली.
संस्थेचे सहसचिव बंडू काका जगताप ,गौरव कोलते यांनीही आपली मनोगते व्यक्त केली .
कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरुण कोळेकर यांनी केले.
याप्रसंगी प्रा.डॉ. राजकुमार रिकामे, प्रा. कल्पना रोकडे ,प्रा. राजेंद्र कोल्हे ,प्रा.पोपट झोंबाडे, प्रा. महेश गावडे ,प्रा. गौरी फडतरे, प्रा.पूनम कुदळे ,प्रा नेत्राली काकडे , बाळकृष्ण मोकाशी, श्री.आकाश चाचर , सुरेश खरात ,श्याम पवार , सुरेखा जगताप, सिताराम भोकटे, विद्यार्थी उपस्थित होते.
Comments are closed