पिंपरी, दि. २६ :- सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत महापालिकेमार्फत सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी होणा-या जनसंवाद सभांचे आयोजन केले जाणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता १५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत घोषित केली आहे. या आचारसंहिता कालावधीत जनसंवाद सभांचे आयोजन केले जाणार नसल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय कार्यालयीन कामकाजाचा दिवस असलेल्या प्रत्येक महिन्याच्या दुस-या व चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते.
0000
Comments are closed