सांगवी, दि.२७:- पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवीतील बालाजी लॉन्स येथे ‘माहिती अधिकार अधिनियम, २००५, दफ्तर दिरंगाई कायदा आणि सेवा हमी कायदा, २०१५’ यांची माहिती सर्व सामान्य जनतेला व्हावी यानिमित्ताने ॲड. अक्षय मोहन शितोळे (विद्यमान सदस्य पुणे बार असोसिएशन) आयोजन केले होते. कार्यक्रमास उत्तम असा प्रतिसाद मिळाला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲड. ज्ञानेश्वर जयसिंगराव देशमुख, माहिती अधिकार कार्यकर्ते संजय कुऱ्हाडे आणि ओमकार देशमुख साहेब यांचे व्यांख्यान होते.
यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संतोष बापुराव खामकर, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले पाटील व पुणे, पिंपरी चिंचवड बार असोसिएशन चे कार्यकारणी उपस्थित होते.
Comments are closed