📌 अनेक मतदारसंघात जिंकणाऱ्या उमेदवारापेक्षा हरणाऱ्या उमेदवाराला पोस्टल मते अधिक.

🗳️ त्यानुसार त्या मतदारसंघातील नक्की ट्रेंड कोणता ? प्रश्नचिन्ह उपस्थित.

👉 मारकटवाडी येथील ग्रामस्थांनीही बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान करण्याच्या मागणीमुळे हा विषयही अधोरेखित.

मुंबई,दि.४ :- नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालानंतर अनेक तर्कवितर्क रंगत असून यामध्ये एक महत्त्वाचा विषय समोर आला आहे आणि तो म्हणजे ईव्हीएम मधील मतांची आकडेवारी व पोस्टल मतदानाची आकडेवारी.

यात गंमतीदार किस्सा पहायला मिळत असून निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईट मधील‌ जाहीर आकडेवारीनुसार अनेक मतदारसंघात जिंकणाऱ्या उमेदवारापेक्षा हरणाऱ्या उमेदवाराला पोस्टल मतदान अधिक झाल्याचे दिसून येते त्यामुळे जर पोस्टल मतदानामध्ये एखाद्या उमेदवाराला ट्रेंड दिसत असला तरी तो ईव्हएम मध्ये गायब झाला असे विनोदही मतदारसंघात होताना दिसत आहेत. तसेच उमेदवार व कार्यकर्ते यांच्याकडून ईव्हीएम तसेच मतदान पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अधिक पारदर्शकता आणण्यासाठी व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठी  का मोजली जाऊ नये असेही बोलले जात आहे.

मोठ मोठ्या विकसित देशातही जर बॅलेट पेपरवर मतदान होते तर आपल्या येथे किमान प्रचलित पद्धतीनुसार व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्या तरी मोजाण्याची मागणी होत आहे. यावरच नुकताच ठाकरे गटाने नाही अभ्यास करून एक कार्यक्रम घेतला व त्यावेळी वरुण सरदेसाई यांनीही पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमधील ट्रेंड इतका कसा बदलला? असा सवाल उपस्थित करत आकडेवारी मांडली आहे.

ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेत वरूण सरदेसाई म्हणाले की, विधानसभेचा निकाल लागला. पण, त्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाहीत. विरोधी पक्षातील अनेक उमेदवारांना सम-समान आकडेवारी पाहायला मिळाली. एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे पोस्टल आणि बॅलेट मतदान. पोस्टल बॅलेट मतदान हे ट्रेंडचं रिप्रेझेंटेशन असतं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मविआची 31 महायुतीला लिड होतं. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पोस्टल मतदानामध्ये महाविकास आघाडी 143 जागांवर लीडवर आहे. तर महायुती 140 जागांवर आघाडीवर आहे. तर ईव्हीएमच्या आकडेवारीत 143 वरून 46 जागांवर महाविकास आघाडीला लीड आली आहे, असे त्यांनी म्हटले.

 पोस्टल मतदानात मागे असणारी महायुती EVM मतमोजणीत आघाडीवर कशी?

हे सगळे आकडे निवडणूक आयोगाच्यावे बसाईट वरून घेतले आहे. पोस्टल टू व्हीएम मतं आमची कुठेच कशी वाढलीना हीत? यामध्ये अनेक सीट्स आम्ही हरलोत तर काही सीट्स आम्ही जिंकलो. त्यामध्ये अनेक ठिकाणी असाच निकाल पाहायला मिळत आहे त्यामुळे प्रश्न उपस्थित होतात.

 

विधानसभा निकाल व पोस्टल मतदान पाहण्यासाठी निवडणूक आयोगाची वेबसाईटची लिंक 👉

https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/ConstituencywiseS13213.htm

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!