पुणे, दि. 5:-  मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या १० वाहनांचा जाहीर ई-लिलाव २६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे ठेवण्यात आला आहे; ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी उपलब्ध असून वाहन मालक, चालक व वित्तदात्यांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी कळविले आहे.

ई-लिलाव सहभागी होण्याकरीता १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करावी. लिलावाचे अटी व नियम ९ डिसेंबर रोजी पासुन कार्यालयीन कामकाजाच्यादिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथील नोटीस बोर्डावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. तसेच सदरची वाहने पाहण्याकरीता ९ ते २४ डिसेंबर या कालावधीत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड येथे उपलब्ध असणार आहेत. ‘वाहने जशी आहे तशी’ या तत्वावर जाहिर ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.

 

वाहनांची यादी www.eauction.gov.in या संकेतस्थळावर, प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय पुणे शहर, हवेली, जून्नर, मावळ, खेड, मुळशी, आंबेगाव या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. कोणतेही कारण न देता जाहीर लिलाव रद्द करण्याची अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी स्वत:कडे राखुन ठेवले आहेत.


 

पोस्टल मते आणि ईव्हीएम मते यामधील फरकावर ठाकरे गटाने लक्ष वेधले .

चिंचवड रेल्वे मार्गावर उभारला जाणार नवीन पूल

 

#

Comments are closed

error: Content is protected !!