मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या वतीने क्रांती दिनाच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहून.डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड,लेफ्टो,सारख्या आजारावर जून्या सांगवीतील मजूर अडयावर,तसेच महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली.
यावर्षी पावसाने थैमान घातले आहे अनेकांचे प्रपंच उद्धस्त झाले आहेत. रोगराई निर्माण झाली आहे. ताप,सर्दी, डोकेदुखी यासारख्या आजाराबरोबरच डेंग्यू सारखे जिवघेणा आजार ही बळकावत आहे. हा आजार होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना व झाल्यावर काय उपाययोजना करावयाच्या याची माहिती दिली. पाणी तुंबल्यावर लेफ्टो, आजार होण्याची शक्यता असते. गॅस्ट्रो, काँलरा,होऊ नये म्हणून दुषीत पाणी पिऊ नये. पाणी उकळून प्यावे,डासांची उत्पती रोखण्यासाठी आपला परीसर स्वच्छ ठेवावा, उघडे पदार्थ खाऊ नयेत, डेंग्यू आजाराचे प्रमाण वाढत आहे, म्हणून घरातील पाणी साठवण्याची भांडी आठवडयातुन एकदा रिकामी करावीत. एक दिवस कोरडा पाळावा,टाक्यांना घट्ट झाकण लावावे,भंगाराची विल्लेवाट लावावी,पाण्याची डबकी आपल्या घराभोवती साचु देऊ नका,
डेंग्यू म्हणजे डंख छोटा धोका मोठा,
डासाची उत्पती साठलेल्या पाण्यात होत असल्याने सर्वांनी स्वतः बरोबरच आपला परीसरही स्वच्छ ठेवण्याचे आव्हान मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड यांनी स्पीकर द्धारे ,पत्रकाद्धारे नागरिकांना व विद्यार्थ्यांना करत होते.तसेच आम्ही यापुढे ही झोपडपट्टी, मोठमोठ्या सोसायटी मध्ये ही जनजागृती करणार आसल्यचे जोगदंड यांनी सांगितले.
Comments are closed