पुणे , दि . १ ५ :- राष्ट्रीय लोक अदालत मध्ये महेंद्र महाजन , प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयात एक महत्वाची तडजोड होऊन पक्षकारांना नुकसान भरपाई 1.25 कोटी रुपये मिळाले तसेच पुणे मुंबई महामार्गावर 2021 साली घडलेल्या अपघात प्रकरणी जखमीस 75 लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली.
सदर जखमी व त्याचे वडील मोटार सायकल वरून जात असताना त्यांना भरघाव वेगाने कार जाताना त्यांना धडक दिली होती. त्यानी सदर अपघातात ते जखमी होऊन त्यांच्या कुटंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. तथापि लोक न्यायालयात सदर खटला तडजोडीने मिटल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळाल्याने कुटुंबीयांस दिलासा मिळाला.
सदर खटल्यात यशस्वी तडजोड करण्यास अधिवक्ता बी. सूर्यवंशी व एचडीएफसी इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मदत केली. तर जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश सदर खटला तडजोडीने मिटविण्यासाठी मार्गदर्शन व योगदान दिले. त्यामुळे सदर खटला तडजोडीने निकाली दोन्ही पक्षकारांना दिलासा मिळाला.
या तडजोडीने पुणे जिल्हा न्यायालयात असलेल्या इतर कुटुंबांच्या सुद्धा न्याय मिळवण्यास आणि उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच्या न्यायलय प्रकरणांचे तात्काळ निराकरण करण्यात मदत केली आहे.
Comments are closed