आदर्श विद्यार्थी, एसएससी बोर्ड चे गुणवंत विद्यार्थी यांचाही सत्कार.

सांगवी,दि.१९ :- जनता शिक्षण संस्थेच्या नवी सांगवी येथील ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल व गुरुनानक हायस्कूलच्या वतीने निळू फुले नाट्यगृह येथे स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप होते .
रेट्रो टू मेट्रो या थीमवर आधारित सांस्कृतिक नृत्याच्या कार्यक्रमात पाणी बचतीचा संदेश देणारे नाटक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले 


आज जुन्या काळापासून नव्या काळापर्यंत शिक्षण क्षेत्रात विविध बदल होत असते तरी भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये शाळा व विद्यार्थी ही पद्धत आजही टिकून आहे तसेच बदलत्या काळातही गुरूंविषयी असलेली आत्मीयता विविध उदाहरणातून नेहमीच पाहायला मिळते हे या नृत्यामधून सांगण्यात आले. तसेच पाणी हेच जीवन असून पाणी जपून वापरणे पाण्याचा अपव्यय टाळणे हे कार्यक्रमादरम्यान नाटकातून सांगण्यात आले.

कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्ष जयप्रकाश जगताप, उपाध्यक्ष रमेश कार्ले, कार्याध्यक्ष महेशकुमार आगम, जनरल सेक्रेटरी सुभाष जावळे, खजिनदार कविता गोरे, असिस्टंट सेक्रेटरी प्रा. प्रदीपकुमार नागवडे, माजी जनरल सेक्रेटरी लालासाहेब भुजबळ, माजी मुख्याध्यापक सुदाम हिरवे ,सामाजिक कार्यकर्ते गौरव टण्णू, नरेंद्र वाडते, रुपाली गायकवाड, वैशाली शेवाळे, अपूर्वा भूजबळ, मानसी कडव,
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रीती चव्हाण, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नंदा काकडे, संस्कृतीक विभाग प्रमुख शामली खैरे, शितल भुजबळ उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान बोलताना संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा. सुभाष जावळे म्हणाले की, “भविष्यातील आदर्शवत विद्यार्थी घडवणे हाच जनता शिक्षण संस्थेचा हेतू असून त्यासाठी योग्य मार्गदर्शन संस्थेतील शिक्षकांकडून नेहमीच केले जाते. तसेच येणाऱ्या काळानुसार बदलते शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास करण्याचा आमचा नेहमीच मानस राहिला आहे.”
संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप म्हणाले की,” विद्यार्थी केंद्रित शिक्षण तसेच सामान्यातील सामान्य घटकापर्यंत ज्ञानरूपी प्रकाश शिक्षणाच्या माध्यमातून मिळावा. यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. आपला विद्यार्थी हा भविष्यातील उत्तम नागरिक कसा घडेल यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. केवळ गुणवान विद्यार्थी न घडवता सर्वांगीण विकास असलेले विद्यार्थी ही समाजाची आजची गरज आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली शहाणे फरणाज पीरजादे यांनी केले व आभार रिताली स्वामी यांनी मानले.

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!