रांगोळीतून अवतरल्या ज्ञानज्योती ; सावित्रीबाई फुले जयंती साजरी
एस जे एच गुरुनानक हायस्कूल व ब्लॉसम इंग्लिश मीडियम प्राइमरी स्कूल यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
नवी सांगवी :- नवी सांगवी येथील जनता शिक्षण संस्थेच्या एस जे एच गुरुनानक हायस्कूल व ब्लॉसम इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.
इयत्ता १ली ते ४थी व ५वी ते ८वी अशा दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचे वर्णन करणाऱ्या रांगोळीचे रेखाटन केले तसेच स्त्री जागर व स्त्री शक्ती यांची माहिती सांगणारे चित्र काढले.
यावेळी मुख्याध्यापिका नंदा काकडे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांनी तत्कालीन सामाजिक संकटांचा सामना करत शैक्षणिक वसा पूर्ण केला. विद्यार्थ्यांनी अडचणींवर कशी मात करायची व त्यातून यशाचे ध्येय कसे गाठायचे हे सांगितले.
रांगोळी स्पर्धा – लहान गट. – १ली ते ४थी
प्रथम – चौटिया नैनिका.
द्वितीय – भांडी माही.
मोठा गट. – इ. ८वी ते ९वी
प्रथम शिंदे तनिष्का.
द्वितीय कांबळे स्नेहल
मध्यम गट – इयत्ता पाचवी ते सातवी
प्रथम- बोरसे स्वरा
द्वितीय- शहाणे राजनंदिनी
तर मुख्याध्यापिका प्रीती चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले यांची शैक्षणिक कार्य या विषयी माहिती , त्यांचे साहित्य व सामाजिक कार्य विद्यार्थ्यांना सांगितले.
वक्तृत्व स्पर्धा
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रसंग विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त केले सावित्रीबाई फुले यांचे बालपण त्यांची स्त्रियांसाठीचे कार्य तसेच सामाजिक भूमिका याबद्दल विद्यार्थ्यांनी विविध पैलू सादर केले.
निबंध स्पर्धा
छोटा गट इ.१ली ते ४ थी
प्रथम – जगताप वेदांत
द्वितीय – गीत कवी
निबंध स्पर्धा-
मध्यम गट ५ वी ते ७ वी
प्रथम – बीडकर ईश्वरी
द्वितीय – कुदळे शौर्य
मोठा गट – इ . ८ वी ते ९ वी
प्रथम – अगम स्वराली
द्वितीय – शेख तुल्हा
चित्रकला स्पर्धा.
छोटा गट – १ ली ते ४थी
प्रथम – दिवेकर स्वराज
द्वितीय – वाघोले आरोही.
कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका शितल शिंदे व शामली खैरे, शुभांगी जगताप यांनी केले. तर आभार प्रियांका लोमटे यांनी
मानले.
Comments are closed