जळगाव दि. ७ (punetoday9news) :- राज्यभरात वीज बिलाच्या तक्रारींचा महापूर आला आहे. सततच्या तक्रारींनी राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी जाहीररित्या वाढीव वीजबिलाबाबत रोष व्यक्त केला आहे. यामध्ये आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचाही समावेश झाला आहे. एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरातील घराचे वीजबिल भरमसाठ आले आहे. लॉकडाऊन काळात एकनाथ खडसे यांना १ लाख चार हजाराचे बिल आल्याने, त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
लॉकडाऊन काळात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वाढीव बिलं येत आहेत. सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे बिल अवास्तव आहे, ते न भरण्यासारखे आहे, असं खडसे म्हणाले. नागरिकांना येत असलेल्या अवास्तव बिलामध्ये सवलती व सूट द्या, अवास्तव बिलाच्या तपासण्या करून ग्राहकांना योग्य बिले द्या , अशी मागणी त्यांनी केली. तसेच नागरिकांना वेठीस धरु नका, असं त्यांनी राज्य सरकारला सुनावलं आहे.
Comments are closed