नवी सांगवी, दि.५ :- पिंपरी चिंचवड शहरातील जनता शिक्षण संस्थेच्या नवी सांगवीतील ‘नवी प्राथमिक (टण्णू) शाळेत’ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासन संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तर मुख्याध्यापिका लता सावळे व सामाजिक कार्यकर्ते गणेश बनकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.जयंतीचे औचित्य साधून “दत्तक पालक योजना” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेतील 35 गरजू विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले ‘दत्तक पालक’ योजनेंतर्गत शाळेच्या फी रुपी निधीचे वाटप करण्यात आले.ही मदत निधी समाजातील दानशूर व्यक्तीने,मुख्याध्यापक,शिक्षक,पालक तसेच काही विद्यार्थ्यांनी यासाठी हातभार लावला.विशेष म्हणजे प्रशाळेतील तिसरी ते सातवीच्याही काही विद्यार्थिनी ही आपल्या खाऊच्या पैशातून आपला खारीचा वाटा या कार्यक्रमासाठी उचलला.
याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका लता सावळे यांनी जयंती व पुण्यतिथी का साजरी करायची याची माहिती सांगितली.तर संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे म्हणाले की ज्याप्रमाणे सावित्रीबाईंनी अनेक अडचणींवर मात करून आपल्या कार्यात यश संपादन केले त्याचप्रमाणे आपणही अडचणींतून मार्ग काढून सदैव आपले ध्येय गाठण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे,असा संदेश आपल्या भाषणातून प्रमुख पाहुणे संजय मराठे यांनी विध्यार्थ्यांना दिला आणि लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप व आमदार शंकर जगताप यांच्या कार्यातून प्रेरित होऊन मी हे समाज उपयोगी मदत कार्य दरवर्षी करीत आहे असे सांगितले.
या प्रसंगी संजय मराठे,गणेश बनकर,राजश्री पतंगे,सुप्रिया सावंत, ज्योती गायकवाड ,संगीता कराते,उषा पोळ,मनीषा चांदेकर,सुनीता भिसे,उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन मुख्यध्यापिका लता सावळे व माधवी गुरव यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील दरेकर यांनी केले. उषा पोळ यांनी मनोगत व्यक्त केले.तर सुनिता भिसे यांनी आभार मानले.
Comments are closed