नवी सांगवी ,दि.५ :- लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप भाजी मार्केट,साई चौक येथे स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

चार वर्षापूर्वी भाऊंनी भाजी विक्रेते रस्त्यावर थांबल्यानंतर भाजी विक्रेत्यांवर होणारी अतिक्रमणाची कारवाई,भाजी विक्रेत्यांना जागेचा अभाव अशा अनेक समस्या जाणून घेऊन साई चौक येथे भाजी विक्रेतांना जागा उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या या कर्तव्यदक्ष कामामुळे आज साई चौक भाजी मार्केट येथे तब्बल 126 भाजी विक्रेते आनंदाने भाजी विकून आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरीत आहेत.भाऊंनी केलेले हे उपकार भाजी विक्रेते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत.त्याचबरोबर लोकनेते स्व.आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमदार शंकरभाऊ जगताप हे ही आम्हाला सर्व प्रकारची मदत व मार्गदर्शन करीत आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे ही ऋणी आहोत.

त्यावेळी भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे,उपाध्यक्ष कुणाल धिवार,प्रसिद्ध गोल्डमॅन रमेश गाढवे,रमेश डफळ,बबन डफळ,गणेश मते,नवीद खान,अंकुश आपेट,बळीराम भोंगे,बळी बिरादार,निलेश बडगुजर,नितीन दोधाड,नरसिंग यादव,सुनील सावंत,अण्णा नायडू,गणेश पैठणे,रामजी आगलावे आधी भाजी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!