सांगवी ,दि.९ :- सांगवी परिसर महेश मंडळाच्या(महिला समिती)वतीने महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनी व विक्री मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. 

महिला साठी प्रदर्शन व विक्री मेळावा नवी सांगवीतील मल्हार गार्डन येथे आयोजित करण्यात आला.

या मेळाव्याचे उद्घाटन माननीय माजी महापौर माई ढोरे आणि मा नगरसेविका शारदा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे सुशीला राठी ह्या उपस्थित होत्या.

या कार्यक्रमामुळे महिलांना उद्योजकतेच्या क्षेत्रात प्रोत्साहन मिळेल, तसेच महिलांना एकमेकांशी संवाद साधून खूप काही शिकण्याची आणि अनुभवांची देवाण-घेवाण करण्याची संधी अश्या मेळाव्यात मिळते. महिलांसाठी हा एक महत्त्वाचा मंच आहे, जिथे त्यांना व्यवसायाच्या वाढीसाठी नवनवीन संधी आणि मार्गदर्शन मिळेल असे प्रतिपादन माई ढोरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांगवी परिसर महिला मंडळाच्या अध्यक्षा गौरी नावंदर आणि कार्यकारणी सदस्या पद्ममा लोहिया, नम्रता नावंदर, सुरेखा चांडक, दिपाली माहेश्वरी, कविता लड्डा, जमुना राठी, श्रुती मंत्री, कीर्ती समदानी यांच्या अथक परिश्रमांचे योगदान अनमोल ठरले.


 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!