पिंपरी दि ,७(punetoday9news) :- पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या पार्श्वभूमीवर शहरातील दोन ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत . यापैकी नेहरू नगरमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत असलेल्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भेट देत कामाची पाहणी केली.

दरम्यान, राज्यात कामगारांचा तुटवडा होत असल्याचे कामगार कसे आणले जात आहेत याचीही माहिती घेतली . मराठी कामगार आहेत का ? याचीही विचारणा अजित पवार यांनी केली त्यावर राजस्थान आणि महाराष्ट्रातील कोकण आणि मुंबई मधील कामगार कोविड सेंटर उभारत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, यांच्यासह राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांचा आकडा २६ हजारांच्या पुढे गेला आहे . व वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या परिसरात दोन जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत. दरम्यान, नेहरू नगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये ६१६ ऑक्सिजन युक्त आणि २०० आयसीयू बेड असणार आहेत अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

Comments are closed

error: Content is protected !!