सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल नागणे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पुणे, दि.28 :-  रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे,पिंपरी चिंचवड यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा,भोसे( ता.खेड ) येथे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, सहाय्यक प्रादेशिक सुरेश आव्हाड व पवन नवाडे ,मोटार वाहन निरीक्षक निनाद सुर्वे आदी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल नागणे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

जनजागृती कार्यक्रमात बोलताना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल नागणे उपस्थित पालक,विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, रहदारीचे नियम जीवनाच्या सुरक्षिततेसाठी असतात. त्याकडे नियम म्हणून न पाहता कर्तव्य म्हणून पहावे.

आजचा विद्यार्थी उद्याचा चालक असल्याने त्यांच्यात जागृती झाल्यास भविष्यात अपघातांना आळा बसू शकतो.शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत असताना एक जबाबदार नागरिक बनावे. रस्त्यावर एखादा अपघात घडल्यास तात्काळ अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे, वाहन चालवतांना हेल्मेट, सीट बेल्टचा वापर करावा. मद्यपान करून वाहन न चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे, अति वेगाने वाहन न चालवणे अशा वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन केले.

तसेच रुग्णवाहिका संपर्क १०८ ,वाहतूक नियम यांचे उल्लंघन केल्यावर करण्यात येणारी कारवाई याविषयी त्यांनी विद्यार्थ्याना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!