AI आधारित डेंटल रेडियोग्राफ एनालिसिस सिस्टम दंतचिकित्सेच्या क्षेत्रात क्रांती घडवणार

पिंपरी : प्रतिनिधी

पुण्यातील सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. आदित्य पतकराव, डॉ. राघवेंद्र मेडीकरी आणि डॉ. ज्योत्सना अड्डे यांना त्यांच्या AI आधारित डेंटल रेडियोग्राफ एनालिसिस सिस्टम या अद्वितीय शोधासाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरणाऱ्या या प्रणालीद्वारे दात व हिरड्यांच्या समस्यांचे अचूक निदान करणे शक्य होणार आहे. या प्रणालीच्या मदतीने पेरियोडोंटल डिजीज (हिरड्यांचे आजार ) यांसारख्या गंभीर आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करता येणार आहे. रेडियोग्राफ डेटाचा सखोल अभ्यास करून ही प्रणाली सूज, हाडांच्या हानीसारखे लक्षणे ओळखते आणि समस्येची तीव्रता ठरवते.

या तंत्रज्ञानाला अधिक परिपूर्ण करण्यामध्ये डॉ. राघवेंद्र मेडीकरी आणि डॉ. ज्योत्सना अड्डे यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी या प्रणालीची विश्वासार्हता आणि अचूकता सिद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

“पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत ही तंत्रज्ञान अधिक वेगवान आणि अचूक आहे. हे केवळ दंतचिकित्सकांची कार्यक्षमता वाढवणार नाही, तर रुग्णांच्या उपचारांना जलद आणि उच्च दर्जाचे बनवेल.”

दंतचिकित्सेच्या क्षेत्रात हा शोध एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पुण्यातील डॉ. आदित्य पतकराव आणि त्यांच्या टीमचा हा शोध संपूर्ण भारताला अभिमान आहे.

– डॉ. आदित्य पतकराव

 


 

पत्रकारांनी बातमी करताना कोणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये : अशोक वानखेडे

रस्ता सुरक्षा अंतर्गत भोसे येथील शाळेत जनजागृती.

सांगवी परिसर महेश मंडळाच्या वतीने महिलांच्या सशक्तीकरण, उद्यमशीलतेला प्रोत्साहन 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!