जेजुरी,दि.३१ :-  विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातूनच खेड्यांतील प्रश्नांची आणि सामाजिक परिस्थिती जाणीव निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी अशी शिबिरे महत्त्वाची ठरतात. माझ्यातील नेतृत्वगुण वाससढीला लागण्यासाठी व व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी अशीच शिबिरे उपयोगी पडली आहेत. महात्मा गांधींनी खेडी स्वयंपूर्ण होण्याचे स्वप्न पाहिले होते. महात्मा गांधीजींचा ग्रामीण जीवना संदर्भातील सर्वांगीण बदलांचा विचार आजही दिशादर्शक आहे. देशाची बहुसांस्कृतिकता आणि एकता ही वैशिष्ट्ये आहेत. ज्ञानाची कास धरून समाज आणि देश बदलण्यासाठी त्यांचा वापर करावा ,असे आवाहन विजय कोलते यांनी केले.

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरच्या जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने युथ फॉर माय भारत आणि युथ फॉर डिजिटल लिटरसी अंतर्गत जनजागृती व विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन धालेवाडी ता. पुरंदर जि. पुणे येथे करण्यात आले आहे.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कोलते ,उद्घाटक प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे, सरपंच वंदना काळाणे, उपसरपंच अंकिता काळाणे, मा.सरपंच संभाजी काळाणे ,प्राचार्य डॉ. धनाजी नागणे ,उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते, सहसचिव शिवाजी घोगरे ,हनुमंत काळाणे ,काळाणे गुरुजी, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अरुण कोळेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते .सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटनपर भाषणात प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे म्हणाले की ,विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन आणि श्रमप्रतिष्ठा ही मुल्ये रुजविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची श्रमसंस्कार शिबिरे एका अर्थाने कार्यशाळा ठरतात. देशाचा एक जबाबदार नागरिक घडविण्याचा पाया अशा शिबिरातूनच घातला जातो. त्यामुळे ही शिबिरे विद्यार्थ्यांनी गांभीर्यानी घ्यायला हवीत, असे विचार व्यक्त करुन त्यांनी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अरुण कोळेकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व मनोगत प्राचार्य डॉ.धनाजी नागणे यांनी केले .

याप्रसंगी सरपंच वंदना काळाणे ,उपसरपंच अंकिता

काळाणे ,संभाजी काळाणे, हनुमंत काळाणे यांनी मनोगते व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मुकुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय ,सोमेश्वरनगर यांची ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून निवड केल्याबद्दल प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांचा आणि

प्रा.नेत्राली काकडे यांची (कोथळे) अंकिता काळाणे (धालेवाडी ) यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल विजय कोलते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार प्रा.चंद्रशेखर काळे यांनी मानले. याप्रसंगी प्रा. डॉ. राजकुमार रिकामे , डॉ. शिवाजी भिंताडे , प्रा. राजेंद्र कोल्हे ,प्रा.डॉ. गणेश पांढरे, प्रा.पूनम कुदळे , प्रा.पोपट झोंबाडे, श्री बाळकृष्ण मोकाशी, आकाश चाचर व ग्रामस्थ उपस्थित होते.

#

Comments are closed

error: Content is protected !!