दापोडी,दि.२० :- ज्या संस्थेच्या शाळेने मला संस्कार दिले… माझ्या अजानत्या वयात मला शालेय शिक्षणाबरोबर स्वावलंबनाचे धडे दिले… त्यातूनच मी घडलो आणि आज उद्योगपतीचा नावलौकिक घेऊन मी तुमच्यासमोर उभा उभा आहे. शाळेचे हे ऋण मानुन शाळेच्या संस्थेच्या उपक्रमांसाठी मी सदैव कार्यरत राहीन असे प्रतिपादन उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विनीत शिंदे यांनी दापोडी येथे व्यक्त केले.

जनता शिक्षण संस्थाने आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा सुभाष जावळे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष सूर्यवंशी, प्रदीप पाबळे, मुख्याध्यापिका छाया खटावकर, राजश्री बिष्ट, पर्यवेक्षक अशोक खराटे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. संस्थेचे माजी विद्यार्थी असणारे विनय शिंदे यांनी शाळा आणि संस्थेच्या विकासाठी सामाजिक जाणिवेतून शिवजयंतीचे औचित्य साधून विनय शिंदे यांनी पाच लाखाची देणगी जाहीर करून तात्काळ सदर रकमेचा धनादेश संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा सुभाष जावळे यांच्याकडे सुपूर्त केला. शिंदे यांनी संस्थेप्रती दाखविलेल्या दातृत्वाबद्दल संस्थेच्या वतीने शिंदे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

 

शिंदे पुढे म्हणाले मी खडतर परिस्थितीवर मात करून इथपर्यंत पोहोचलो. परिस्थितींच्या चटक्यांची जाणीव मला आहे. म्हणूनच गरीब होतकरु विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मी कटीबद्ध असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य जयप्रकाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मागील एक वर्षभरात उपाध्यक्ष रमेश कार्ले, कार्याध्यक्ष महेशकुमार आगम ,खजिनदार कविता गोरे, जनरल सेक्रेटरी प्रा. सुभाष जावळे, जॉईंट सेक्रेटरी रवींद्रनाथ नवले, असिस्टंट सेक्रेटरी राजेंद्र खरमाटे , प्रा. प्रदीपकुमार नागवडे, ग्रामीण संचालक प्राचार्य हेमंत तांबे, बाळासाहेब पौळ या संचालकांनी संस्थेच्या विविध शाखांमध्ये केलेल्या विकास कामाबद्दल कौतुक ही केले. आभार पर्यवेक्षक अशोक खराटे यांनी मानले.

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!