पिंपरी दि. ७ . (punetoday9news) :- संपूर्ण भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने लोकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा विचार करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलण्यात आले . मात्र त्यानंतर आता ऑगस्ट महिना सुरु होऊनही शाळा बंद असल्याने आता चालू शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये असा सूर बनत आहे त्यासाठी केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे . मात्र राज्य सरकारनेही त्याला हिरवा कंदील दाखवणे गरजेचे आहे . महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या पाहता महाराष्ट्र राज्यात शाळा सप्टेंबर मध्ये लगेच सुरु होण्याची शक्यता धूसर वाटते .
केंद्र सरकार कडून १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा विचार केला जात आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे.

अशी असू शकते शाळा :

शाळांना सकाळी ८ ते ११ आणि १२ ते ३ अशा दोन शिफ्ट कामकाजासाठी दिल्या जाऊ शकतात. मध्ये १ तास हा शाळा सॅनिटाइज करण्यासाठी असेल. १० आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या १५ दिवसांमध्ये शाळेत उपस्थित राहण्यास सांगितलं जाऊ शकतं. नंतर ६ वी ते ९वी चे वर्ग सुरु केले जाण्याची शक्यता आहे. एकाच दिवशी एका इयत्तेतील सर्व तुकड्यांना शाळेत न बोलावता प्रत्येक तुकडीला वेगळा दिवस ठरवून दिला जाऊ शकतो. दरम्यान, ३१ ऑगस्टनंतर अनलॉकच्या नव्या गाईडलाईन्समध्ये शाळा पुन्हा सुरु करण्याविषयी घोषणा केली जाऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत केव्हा आणि कसे बोलवायचे हा निर्णय पूर्णतः राज्यांच्या हातात असणार आहे.

Comments are closed

error: Content is protected !!