अरविंद एज्युकेशन सोसायटी तर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळा संपन्न

 

पिंपरी, प्रतिनिधी :

शिक्षकांमध्ये वेळेचे नियोजन, तंत्रज्ञानाची माहिती, कामाचे नियोजन हवे. मुलांमध्ये वाचनाची आवड कशी निर्माण होईल, याबाबत शिक्षकांनी विविध क्लृप्त्या वापरल्या पाहिजेत. या दृष्टीने शिक्षकांना अद्ययावत ठेवण्यासाठी जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्यावतीने लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांसाठी व्यक्तिमत्त्व विकासावर एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये शिक्षकांना व्यक्तिमत्त्व विकास, भाषा व संवाद कौशल्य या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे झालेल्या कार्यशाळेत प्रसिध्द वक्ते चिराग शाह यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, तेजल कोळसे पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते.

चिराग शाह म्हणाले, विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञान देण्यासोबतच शारीरिक व आध्यात्मिक शिक्षण देण्याचा प्रयत्न अरविंद एज्युकेशन सोसायटीत केला जातो, ही स्तुत्य बाब आहे. असे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचा व्यक्तिमत्त्व विकास महत्त्वाचा आहे. शिक्षकांमध्ये वेळेचे नियोजन, तंत्रज्ञानाची माहिती, कामाचे नियोजन हवे. मुलांमध्ये वाचनाची आवड कशी निर्माण होईल, याबाबत शिक्षकांनी विविध क्लृप्त्या वापरल्या पाहिजेत. या विषयी शाह यांनी शिक्षकांना सूचना केल्या. आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह उपलब्ध असला पाहिजे, विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यापूर्वी शिक्षकांनी स्वत: कोणत्या पद्धतीने वाचन करावे, आदर्श व उत्साही शिक्षकामधील गुण, त्यांचा विकास या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे मानसिक प्रश्न शिक्षकांनी समजून घ्यावेत, त्यांना मानसिक समस्येतून बाहेर काढता यावे. ज्यांच्याकडे आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक गुणांचा समतोल आहे अशी व्यक्ती सुदृढ असते, अशी उपयुक्त माहिती चिराग शाह यांनी शिक्षकांना दिली.

आरती राव प्रास्ताविक करताना म्हणाल्या, की शिक्षक समाजामध्ये शिक्षणाचे महत्त्वाचे काम करीत आहेत. आदर्श नागरिक घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. यासाठी शिक्षकांनी सकारात्मक विचार ठेवून उत्साहात काम केले पाहिजे. तेजल कोळसे पाटील यांनी सांगितले, ही कार्यशाळा संस्था आणि शिक्षकांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल

#

Comments are closed

error: Content is protected !!