केरळ, दि.७.(punetoday9news):- केरळच्या कोळीकोडमध्ये एअर इंडिच्या विमानाला अपघात झाला आहे. एअर इंडिया एक्स्प्रेसचं हे विमान होतं. घटनास्थळी NDRFची टीम दाखल झाली आहे.
“या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तसंच 4 जण तुटलेल्या विमानात अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच जखमी प्रवाशांना विविध रूग्णालयात दाखल करण्यात आलंय,” असं केरळचे पोलीस महासंचालक लोकनाथ बेहरा यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले आहे.
विमान लँड करताना ते रन वे सोडून पुढे गेल्याने हा अपघात झाल्याचं केरळचे कॅबिनेट मंत्री के राजू यांनी दिली आहे. या विमानात 191 प्रवासी आहेत. एअर इंडियाचं हे विमान दुबईहून आले होते, असे एअर इंडियानं सांगितले आहे. बोईंग 737 प्रकारचे हे विमान करीपूर धावपट्टीवर संध्याकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी लॅंड करत होते. माजी मंत्री अल्फान्सो के. जे. यांनी आपल्या ट्वीटमध्ये पायलटचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. दीपक साठे या विमानाचे पायलट होते. त्यांनी आधी एअर फोर्समध्येसुद्धा काम केलं होतं.
दीपक साठे बरेच अनुभवी पायलट होते, त्यांचं वय 58 होतं. त्यांना पेसिंडेंट गोल्ड मेडेलसुद्धा मिळाले होते.घटनास्थळाकडे किमान 24 रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या काही गाड्या तात्काळ रवाना झाल्याची माहिती आहे.
Comments are closed