पिंपरी,दि.८ (punetoday9news):- पिंपरी-चिंचवडमध्ये काही दिवसापूर्वी भोसरी येथे आयडिआ कंपनीतून बोलत असल्याचे सांगून सिम अपडेट करण्याच्या बहाण्याने एका युवकाची फसवणूक झाल्याची घटना ताजी असतानाच आता हिंजवडी येथे एका उच्च शिक्षित डॉक्टरची पेटीएमक़डून बोलत असल्याचे सांगून केवायसी अपडेट करायच्या बहाण्याने मोठी फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेप्रकरणी शुक्रवारी हिंजवडी पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी डॉ. मिलिंद शरद गावडे (वय ५७, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना १८ जून रोजी घडली असून गावडे यांनी शुक्रवारी हिंजवडी पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. मिलिंद गावडे यांच्या खासगी मोबाईल क्रमांकावर अज्ञात आरोपीने ७४७८८६८२८८ या मोबाईल क्रमांकावरुन फोन करीत आपण पेटीएमकडून (paytm) बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना केवायसी अपडेट करण्यास सांगितले. परंतु, केवायसी अपडेट न झाल्याने त्याने एक ऍप डाउनलोड करण्यास सांगितले.

Comments are closed

error: Content is protected !!